आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती घोटाळा; सचिवस्तरीय चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विशेष जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर जमा केलेल्या शिष्यवृत्ती अपहाराच्या रकमेचा आकडा आता २८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संपूर्ण राज्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणारी एकच कंपनी असल्याने इतर जिल्ह्यांत अशाच प्रकारचा शिष्यवृत्ती घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
बुधवारी सोलापूर शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विशेष समाजकल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शिष्यवृत्तीच्या यादीमध्ये बोगस नावे घुसवून त्यांना कोटी २३ लाख रुपयांची शिष्यवृत्ती जमा केली आणि ही रक्कम त्यांना अदाही करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत हा घोटाळा २८ कोटी रुपयांवर पोहचला असून आतापर्यंत कोटी रुपयांची शिष्यवृती अशा पद्धतीने वाटप झाल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितली.
...तर कंपनीचा मक्ता रद्द
संपूर्णराज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याचा मक्ता मॉस्टेक कंपनीकडे आहे. कंपनीने नियुक्त केलेल्या ऑपरेटरकडून हा घोटाळा करण्यात आला आहे. यातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मॉस्टेक कंपनी दोषी आढळली तर त्यांचा मक्ता रद्द करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री कांबळे यांनी स्पष्ट केले.
पूजा गारमेंटसची चौकशी करा
पूजा गारमेंटसच्या चौकशीला स्थगिती दिली नसून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या संस्थेची चौकशी करावी. संस्थेच्या संचालकांनी शासनाची फसवणूक केली असेल तर जिल्हाधिकारी यांनी संस्थेवर कारवाई करावी.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, माहिती अधिकाराने फोडले बिंग...