आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी गोवंशहत्या बंदी, मगच पांडुरंगाची पूजा, बंडातात्यांचा सरकारला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - अठरा वर्षांपूर्वी राज्याच्या विधिमंडळात गोवंशहत्या बंदीचा कायदा संमत होऊनही सत्ताधारी लोक तो लागू करत नाहीत. या कायदा लागू करण्याची इच्छाशक्ती नसलेल्या सरकारला गोप्रेमी विठ्ठलाची पूजा करण्याचा हक्कच नाही. सरकार कोणाचेही असो, गोहत्याबंदी कायदा लागू करेपर्यंत आषाढी व कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांना करू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी, म्हणजेच दशमीच्या रात्री एक वाजता पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करून वारकरी शासकीय पूजेस मज्जाव करतील, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा वारकरी रोखणार होते. मात्र त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवून गोवंशहत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वारकर्‍यांनी कार्तिकी वारीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूजेस मज्जाव केला. त्यामुळे पवारांनी पूजेस येणेच टाळले होते.

शासनाने अनुभवातून शहाणे व्हावे
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. यातून तरी शासनाला देशातील जनतेची धार्मिक भावना व संस्कृतीचा स्वाभिमान ओळखता येत नसेल, तर आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होऊ शकते. सत्ताधार्‍यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून शहाणे होण्याची संधी गमावली तर ते राज्यकर्त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल, असेही कराडकर यांनी सांगितले.