आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात-बारा उताऱ्यावरील कमी होणार कुळाचा शेरा, १५ फेब्रुवारीपर्यंत १०० प्रकरणे निकाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून मूळ जमीनमालकांच्या सात-बारा उताऱ्यावर असलेला कुळाचा शेरा कमी करण्यासाठी शासनाने मे २०१४ मध्ये आदेश काढले. मात्र, लागोपाठ आलेल्या निवडणुकांमुळे हे काम सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रखडले होते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तहसीलदारांना हे काम १५ फेब्रुवारीपर्यंत मार्गी लावण्याचे आदेश दिले. यामुळे जिल्ह्यात १३ हजार ३१६ जमीनमालकांच्या उताऱ्यावरील कुळाचा शेरा कमी झाल्याने जमीन विक्री करण्यास मुभा मिळणार आहे.

शासनाने मे २०१४ रोजी कुळ कायद्याचा शेरा कमी करण्यासंबंधीचे परिपत्रक काढले होते. याबाबत संबंधित प्रांताधिकारी यांनी शेरा कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. मुंढे यांनी कूळकायदा शेरा असलेल्या सर्व प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदार यांना सूचना दिल्या. त्यानुसार तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करून तलाठी मंडलाधिकारी यांना कूळकायद्याची प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या १६ दिवसांमध्ये जिल्ह्यात ५७३ उताऱ्यांवरील शर्त कमी केली आहे.

जिल्ह्यातील कूळकायद्याची तालुकानिहाय प्रकरणे
भरावा लागणार ४० पट नजराणा
*कूळकायद्याचा शेराकमी करण्यासाठी संबंधित जमीनमालकास शेतसाऱ्याच्या ४० पट नजराणा
*तलाठ्याकडेभरावा लागणार आहे.
*मूळशेतसारा रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे.
*यारकमेच्या ४० पट म्हणजेच २०० रुपयांपासून ८०० रुपये संबंधित जमीनमालकास भरावे लागणार आहेत.

उत्तर सोलापूर ६१७
बार्शी २००१
अक्कलकोट २४२
दक्षिण सोलापूर २४९८
करमाळा १०७४
माढा ११८५
माळशिरस ११०७
सांगोला २४८
मंगळवेढा १५०९
मोहोळ १२३०
पंढरपूर २७२२
एकूण-१३३१६

शर्त कमी करण्याचे आदेश
-शासनआदेशानुसार कूळकायदा कलमाची शर्त कमी करण्यासाठी तालुकानिहाय आदेश दिले आहेत. यासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकरणांची शर्त कमी करण्याचे आदेश संंबंधित तहसीलदारांना दिले आहेत. प्रवीणकुमारदेवरे, अपर जिल्हाधिकारी.