आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमाने पात्र दोन, मात्र इच्छुकांची संख्या मोठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- प्रशासनामध्ये मे महिना म्हणजेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मोसम. अपेक्षित स्थळी बदली व्हावी, यासाठी अधिकारी प्रयत्न करताना दिसतात. जिल्ह्यात प्रशासकीय बदलीसाठी दोनच उपजिल्हाधिकारी पात्र असले तरी बदली होण्यासाठी सर्वच अधिकारी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. ज्यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानुसार शासनपातळीवर प्रक्रिया राबविली जात असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्पष्ट केले.
शासन नियमानुसार एकाच पदावर तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी यांची बदली करता येते. यानुसार महसूल उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे हे पात्र आहेत. काहींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे, मात्र त्यांनी तो नाकारला आहे. बदलीसाठी तहसीलदारही इच्छुक आहेत. बदली इच्छुकांमध्ये अनेकांची पुणे कोल्हापूरसाठी अिधक पसंती आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे आहेत रिक्त...
भूसंपादन क्रमांक ३, पुनर्वसन या कार्यालयास विधानसभा निवडणुकीपासून उपजिल्हाधिकारी नाही. या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अविनाश हदगल हे भूसंपादन अधिकारी होते, मात्र विधानसभा निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत रुजू झालेच नाहीत तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी मिलिंद पाठक आजारी असल्याचे कारण सांगून आजवर रजेवरच आहेत. रोहयो उपजिल्हाधिकारी सर्जेराव मोहिते यांना जिल्हाधिकारी मुंढे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले आहेत.
अकलूज प्रांताधिकारी अमृत नाटेकर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांच्याकडे पदभार सोपविला आहे. या बदली प्रक्रियेत चार उपजिल्हाधिकारी मिळतील का पुन्हा भार प्रभारीवरच राहिल ? हे बदली प्रक्रियेनंतर समोर येईल.
८४ कर्मचाऱ्यांची यादी झाली तयार...
मुख्यालयतालुका पातळीवर काम करणारे तलाठी, मंडलाधिकारी, लिपिक अव्वल कारकून या पदावर काम करणाऱ्या ८४ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. मुख्यालय वर्षे एकच टेबल वर्षे असा नियम आहे. मात्र या बदल्यासंबंधी जिल्हाधिकारी मुंढे बदली प्रक्रिया कशी राबवितात ? याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...