आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसब्याने परंपरा जपली, बैलजोडी मिरवणूक गुणवंत शेतकऱ्यांचा सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कारहुणवी हा सण जनावरांशी संबंधित असला तरी सर्वांचे एकत्रीकरण करून सण साजरा करण्याची कसब्याची पद्धती चांगली आहे. पुढील वर्षापासून या बैलाची चांगली निगा राखणाऱ्यांचा पुष्ठ बैलाचाही सन्मान करा, असे विचार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
कसब्यामध्ये आयोजित कारहुणवी सणानिमित्त बैलजोडी मिरवणूक गुणवंत शेतकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. मंगळवारी सायंकाळी याचे आयोजन होते. बाळीवेस येथील कसबा गणपतीपासून सायंकाळी सात वाजता १७ बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी उपस्थित मान्यवर देशमुख, संघटनेचे अध्यक्ष सिद्धाराम बुगडे, बाळासाहेब भोगडे, बिपीन धुम्मा, प्रकाश वाले, तम्मा मसरे तसेच रहिवाशांच्या उपस्थितीत कसबा गणपतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीने कारहुणवीनिमित्त याचे आयाेजन केले होते. बाळीवेस कसबा येथून निघालेली मिरवणूक - टिळक चौक - चाटी गल्ली - बाळीवेस - कुंभारवेस - सराफ कट्टामार्गे पुन्हा मसरेगल्ली परिसरात मिरवणूक विसर्जित झाली. तसेच शेतीत उकृष्ट काम करणारे शेतकरी शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला. दीपक बिराजदार यांनी ज्वारीचे विक्रमी उत्पादन केले, तर शेळगीचे शेतकरी रेवणसिद्ध यलशेट्टी यांनी दोडक्याचे विक्रमी उत्पादन घेतले. सालगडी चंद्रकांत साळुंके आणि सुनील येलशेट्टी यांचा सत्कार गुंगे परिवाराकडून करण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब हिरेमठ, मनपा स्थायी समिती सभापती पद्माकर काळे, सोमनाथ भोगडे, मन्मथप्पा वारद, रेवणसिद्ध कोनाळी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांची खंत
सत्कारास उत्तर देताना पालकमंत्र्यांनी मी तुमच्या मतांवर निवडून आलो आहे. परंतु, आजवर कसब्याने माझा सत्कार केला नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच मोडकळीस आलेल्या कारंबा पुलाचे काम लवकरात लवकर करून देतो, असेही ते म्हणाले.