आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरकी फिरकी: स करून आंदोलन.. अख्खा इंडिया बेहोश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशांमध्ये विकृत लोकांची संख्या वाढत आहे, या मूर्ख लोकांना भारतीय संस्कार जरा शिकवा नाही तर, देशावर भावी पिढीवर अशा लोकांमुळे वेगळेच परिणाम होतील, अजून पुढचे पण करा, मूर्खासारखे पाश्चात्त्यांचे अनुकरण नका करू. जर काही तिकडच्या लोकांसारखे करायचे असेल तर तिकडे स्वच्छता कशी ठेवतात, वाहतुकीचे नियम कसे पाळतात असे काहीतरी कार्य करा, अशी प्रतिक्रिया यापेक्षा जहाल शब्दात नेटिझन्स देत होते.
कुठे चाललेय ही तरुणाई....निर्लज्जपणे किस केला की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण होईल हे कुणी सांगितले यांना. यांचे फोटो पाहून किळस यायला लागलीय, असेही अनेकांनी म्हटले.

कोचापासून हे किस फॉर लव्ह चे वादळ देशभर घुमू लागले आहे. दिल्लीतही याची प्रचिती आली. नैतिकतेच्या स्वयंघोषित रक्षकांच्या विरुद्ध हे आंदोलन तरूणाईने सुरू केले आहे. रा.स्व. संघ कार्यालयासमोर किस करून निषेध नोंदविला. नयन आणि पंखुडी या तरुण-तरुणीने फेसबुकवर या आंदोलनासाठी आवाहन केले होते. या ‘किस ऑफ लव्ह'ला विरोध करण्यात आला मात्र तरी आंदोलन झाले. या आंदोलनामुळे अख्खा इंडिया बेहोश झाला. समर्थन करावे की विरोध हेच अनेकांना समजेना. पण विरोधी मते जास्त प्रकट होत होती. स्वच्छता अभियान, पर्यावरण, गरिबी असे अनेक मुद्दे आहेत तरुणाई समोर, पण हे गुंतलेत किस घेण्यात, यातून काही साध्य होणार नाही, उलट किळसवाणे होतेय असे अनेकांचे मत पडले. आता तरी या तरुणाईला होश येईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.