आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक: २३ वर्षे केले शिंदेंचे राजकारण, युतीचीच येईल मनपात सत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेत सत्तेचे धनी असलेले महेश कोठे यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने त्या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे त्या प्रभागात कोठे यांच्याविरुद्ध काँग्रेस असाच सामना होणार आहे. निवडणुकीसाठी मंगळवारी मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. महेश कोठे हे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत स्पष्ट बोलले नाहीत.
काँग्रेसच्या नगरसेविका दमयंती भोसले यांचे निधन आणि महेश कोठे यांचे पक्षांतर बंदीमुळे नगरसेवक पद गेले. त्यामुळे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांची संख्या कमी झाली. त्या जागा टिकवणे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. भोसले यांच्या प्रभागात भाजपचे वर्चस्व असल्याचे विधानसभा निवडणुकीवरून दिसून येते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे प्रतिष्ठा पणाला लावतील. त्यामुळे तेथे काँग्रेसला मोठे आव्हान असणार आहे. दमयंती भोसले यांच्या सून भाजपत येण्याची चर्चा आहे. पण तेथे भाजपच्या रेखा फत्तेपूरकर यांनी तिकिटाची मागणी केली आहे.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना महेश कोठे म्हणाले, मी काँग्रेस पक्ष त्यांना सांगून सोडला आहे. पण वडील तात्या आजही काँग्रेसमध्येच आहेत. आम्ही २३ वर्षे सुशीलकुमार शिंदे यांचे राजकारण सांभाळले. महापालिकेत त्यांच्या विचाराने काम केले. व्यक्तिगत एक इंचही जमीन घेतली नाही. उलट विडी घरकुलमध्ये पोलिस ठाण्यास, मनपा दवाखान्यास मोफत जागा दिली. मी काँग्रेस पक्ष सोडताना त्यांना सांगून सोडला. शिवसेनेत मला शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले. आगामी मनपा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती झाल्यास मनपावर युतीची सत्ता येईल. पण त्यासाठी काही जागांच्या बाबतीत तडजोड करावी लागेल. ते सर्वच पक्षांत असते. मनपा निवडणूक कार्यकर्त्यांची असते, त्यात आमची मदत होईल. वार्ड पद्धतीने निवडणुका असल्याने वार्डरचना झाल्यावर नेमकी आखणी करता येईल.
कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही आणि सोडणार नाही. शहर उत्तरसाठी नगरसेवकांना बोलावून निधी दिला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतानुसार आजच्या घडीस एमआयएमचे दहा नगरसेवक येतील. परंतु, त्यांची मोर्चे बांधणी अद्यापही निशिचत नाही. आजच्या स्थितीत युतीला मात्र अनुकुल असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकविला तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही.
आज मतदार यादी प्रसिद्ध होणार
प्रभागआणि १८ च्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी मंगळवारी सकाळी मनपा निवडणूक शाखेकडून प्रसिद्ध होणार आहे. मनपा निवडणूक शाखा आणि झोन क्रमांक दोनमध्ये ती नागरिकांना पाहण्यास उपलब्ध राहील.