आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपलं घर’ने हेलावून गेले रसिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नामदेव वठारे स्मृती लघुपट महोत्सव रविवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरात झाला. त्याला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. एकूण लघुपट या वेळी दाखवण्यात आले. अमृत ढगे यांच्या ‘आपलं घर’ने उपस्थितांना हेलावून टाकले.
नळदुर्ग येथील टेकडीवर राष्ट्रसेवा दलाने सुरू केलेल्या अनाथ मुलांच्या ‘आपलं घर’ची माहिती देणारा हा लघुपट. ममता बोल्ली आणि बळवंत जोशी यांच्या निवेदनाने तो आशयसंपन्न झाला. रंगपंचमीच्या निमित्ताने काही युवक मंडळी या संस्थेत गेले. तिथल्या मुलांसोबत रंग खेळून दिवस घालवला. मुलेही आनंदी झाली. जड अंत:करणाने युवक मंडळी परतीच्या वाटेवर निघाली. त्यानंतर त्यांच्या मनात आलेल्या विचारांचा गोंधळ सुरू होतो. आपलं घर म्हणजे कसे गजबजलेले असते. आई, बाबा असतात. अभ्यासात मदत करणाऱ्या ताई आणि दादाही असतात.
परंतु नळदुर्गच्या ‘आपलं घर’मध्ये असे कोणीच नाहीत. ना आई, ना बाप. तरीही ही मुले आनंदाने राहतात. त्यांच्या भविष्याची चिंता कोण वाहतो...? ‘आपलं घर’ असे आपण म्हणतो. पण खऱ्या अर्थाने आपलं घर नळदुर्गलाच आहे. जिथे शिस्त आहे, अभ्यास आहे. खेळ आहे. माैजमजा आहे. आपलं म्हणायला कोणी नाही. अशा विचारांनी लघुपटाची सांगता होते.
बातम्या आणखी आहेत...