आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकरराव मोहिते बँक; खासदार गटाचे १५ पैकी १४ अर्ज बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- येथील शंकरराव मोहिते बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननीच्या दिवशी मंगळवारी (दि. २३) खासदार विजयसिंह मोहिते गटाचा केवळ एकच अर्ज मंजूर तर १४ अर्ज नामंजूर झाले. तर भानुदास सालगुडे गटाचे सर्व सात अर्ज नामंजूर झाले. सत्ताधारी प्रतापसिंह मोहिते गटाचे सर्व १५ वैध ठरले. त्यामुळे बँकेवर प्रतापसिंहाचे निर्विवाद वर्चस्व राहणार हे सध्या दिसते. खासदार मोहिते गट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपिल करणार असल्याचे उदयसिंह मोहिते यांनी सांगितले.
१५ जागांसाठी ४० जणांचे अर्ज दाखल झाले. छाननीत खासदार मोहिते सालगुडे यांच्या पॅनेलच्या उमेदवारांच्या अर्जावर प्रतापसिंह मोहिते यांचे वकील अॅड. शंतनू करुंजेकर (पुणे) यांनी हरकती घेतल्या. तणाव निर्माण झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. काळे यांनी राखून ठेवलेला निकाल सायंकाळी घोिषत केला.
खासदार मोहिते पॅनेलमधील सर्वसाधारण जागेतील उमेदवार अतुल गांधी यांचा एकमेव अर्ज मंजूर झाला. उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले. सालगुडे पॅनेलचेही सर्व सातही अर्ज नामंजूर केले. सर्वसाधारण गटात गांधी यांचा अर्ज राहिल्याने सर्वसाधारण गटाच्या दहा जागांसाठी निवडणूक लागली. उर्वरित राखीव पाच जागांवर प्रतापसिंह माेहिते पॅनेलचे उमेदवार बनिविरोध झाल्यात जमा आहे. अर्ज नामंजूर झालेल्या उमेदवारांनी बँक पोट नियम ४० नुसार भागाची ठेवीच्या रकमांची पूर्तता केल्याच्या कारणावरून त्यांचे अर्ज नामंजूर केले आहेत.
अर्ज मंजूर झालेले उमेदवार : प्रताप सिंह गट : प्रतापसिंह मोहिते, डॉ. धवलसिंह मोहिते, धनश्री घुले, सुदर्शन मिसाळ, सतीश पालकर, विजय मगर, निवृत्ती निंबाळकर, विठ्ठल इंगळे, लतिका गायकवाड, वंदना गांधी, भाऊसाहेब माने देशमुख, संगीता एकतपुरे, मारुती एकतपुरे, विवेकानंद गवळी, समीर पठाण.
प्रतापसिंह पॅनेलचे बनिविरोध उमेदवार : धनश्री आदित्य घुले, संगीता एकतपुरे, मारुती लोखंडे, विवेकानंद गवळी, डॉ. वंदना गांधी.

खासदार मोहिते पॅनेलमधील सर्वसाधारण जागेतील उमेदवार अतुल गांधी यांचा एकमेव अर्ज मंजूर झाला. उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले. सालगुडे पॅनेलचेही सर्व सातही अर्ज नामंजूर केले. सर्वसाधारण गटात गांधी यांचा अर्ज राहिल्याने सर्वसाधारण गटाच्या दहा जागांसाठी निवडणूक लागली. उर्वरित राखीव पाच जागांवर प्रतापसिंह माेहिते पॅनेलचे उमेदवार बनिविरोध झाल्यात जमा आहे. अर्ज नामंजूर झालेल्या उमेदवारांनी बँक पोट नियम ४० नुसार भागाची ठेवीच्या रकमांची पूर्तता केल्याच्या कारणावरून त्यांचे अर्ज नामंजूर केले आहेत.
दहा जागांसाठी निवडणूक
विरोधी गटातून केवळ एकाच उमेदवाराचा अर्ज मंजूर झाल्याने प्रतापसिंह मोहिते यांचे या बँकेवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व राहणार हे सध्यातरी दिसते. सर्वसाधारण जागेतील एका उमेदवारामुळे दहा जागांची निवडणूक लागली आहे. उदयसिंह मोहिते अपिलात जाणार असल्याने विभागीय आयुक्तांचा निर्णय काय होतो, त्यावरही बरेच काही अवलंबून आहे.
पराभवाच्या भीतीने हरकतीचा डाव
- खासदारकीच्या निवडणुकीवेळी आम्ही त्यांची अनामत जप्ती केली. या निवडणुकीतही ती जप्त करू. निवडणूक जिंकण्याचा विश्वास नसल्यानेच त्यांनी आमच्या अर्जांवर हरकती घेतल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपिल करणार आहोत.
उदयसिंह मोहिते, पॅनेलप्रमुख, खासदार मोहिते गट.
बातम्या आणखी आहेत...