आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तीर्ण ५६ हजार; जागा ६० हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या सोलापूरचा निकाल ९२.१४ टक्के लागला आहे. ६१ हजार १६५ विद्यार्थ्यांपैकी ५६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अकरावी प्रवेशासाठी ५५ हजार ५२० जागा उच्च माध्यमिक विभागाकडे तर तंत्रनिकेतनसाठी हजार जागा अशा एकूण ६० हजार जागा उपलब्ध असल्याने प्रवेशाची तारांबळ उडणार नाही. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशपासून वंचित राहणार नाही.
शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेशाचे काटेकाेर वेळापत्रक तयार केले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी माहिती सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार यांनी दिली. सोलापूर शहर जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित अशा अकरावीच्या एकूण ६४० तुकड्या आहेत. यातून ५५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशित होऊ शकतील. निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी शाळा कॅफे सेंटर येथे मोठी गर्दी होती. यंदा मोबाइलच्या मदतीने निकाल पाहण्यास पसंती होती.

यंदा सोलापूरचा निकाल टक्क्यांनी वाढला
मार्च २०१४ च्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के इतका होता. यंदा यात २.७७ टक्क्यांची वाढ झाली. मागील वर्षी ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.