आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्री सुसाटच, पालिकेचे मात्र "शेपूट'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मोकाट कुत्र्यांनी मुलांवर प्राणघातक हल्ले केले. नीलम नगर भागात झोपलेल्या तान्हुल्याचा पाय धरून आेढत नेल्याचा प्रकार घडला. त्यानंतर दोन वर्षीय मुलीला लोळवत तिच्या चेहऱ्यावर १५ ठिकाणी चावे घेतल्याची थरकाप उडवणारी घटना घडली. तरीही कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे उपाय महापालिकेने केले नाहीत. भटके कुत्रे म्हटले, की शेपूट घालण्याचा प्रकारच महापालिकेकडून सुरू आहे. निर्बिजीकरणाच्या नावाखाली नुसतेच कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार प्रशासन करतोय.
विविध कारणांमुळे रात्रीच्या वेळी घराकडचा प्रवास करणाऱ्या लोकांना मोकाट कुत्र्यांच्या पाठलागाचा सामना करावा लागतो. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी वारंवार पुढे येत असते. अनुराधा गांधी या जागरूक महिला नागरिकाने महापालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून एकूण पत्रे लिहिली. त्या पत्रांची अद्याप दखल महापालिकेकडून घेण्यात आलेली नाही.
वर्षांपासून निर्बिजीकरण नाही
२०१०पासून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले नाही. मागील वर्षात प्रक्रिया सुरू केली पण ती रखडली. बजेटमध्ये नावालाच केली जाते तरतूद.
गणना झाली, आता पुढे काय?
शहरातील मोकाट कुत्र्यांची गणना एकाचवेळी करण्यात आली. प्रभागातील आरोग्य निरीक्षकांनी त्यांची गणना करून दिली. ती गणनाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. कुत्र्यांची गणना झाली पुढे काही झाले नाही.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनुराधा गांधी यांनी महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांकडे लेखी मागणी केली. त्यानंतर स्मरणपत्रे दिली तरीही महापालिका ढिम्मच आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली होती. त्याबाबत टेंडर प्रक्रिया सुरू केली. पण आर्थिक कारण पुढे करत ती प्रक्रिया थांबवण्यात आली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने जननदर वाढतच आहे. मोकाट कुत्र्यांमुळे आजवर अनेकजण जखमी झाले आहेत. रात्री घराकडे जाणाऱ्यांचा मोकाट कुत्रे पाठलाग करतात. त्यामुळे मोटारसायकलवरून पडून अनेक जण जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...