आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांनो, सौभाग्याचं लेणं सांभाळा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वटपौर्णिमा उद्या आहे. सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी अनेक ठिकाणी जातात. सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्र घालून पूजेसाठी जाताना चोरटे दागिने हिसकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दागिने घातल्यानंतर महिलांनी सावध राहावे.
सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत जादा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आले आहेत. होटगी रस्ता, विजापूर रस्ता, रेल्वे स्टेशन, बाळे, विडी घरकुल, हत्तुरेवस्ती, जुळे सोलापूर, आसरा, जुना बोरामणी नाका, शाांती चौक, कर्णिकनगर, सिव्हिल लाइन भागात सर्वाधिक महिलांची गर्दी असते. या ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त पाहिजे. मागील घटनांचा आढावा घेतल्यास मंगळसूत्र हिसकावण्याचा काही तुरळक घटना घडल्या आहेत. त्या होऊ नयेत म्हणून पोलिस महिलांनीही सावध राहावे.
पोलिस बंदोबस्त वाढवला आहे
- सातहीपोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिस बंदोबस्त देतील. मार्शल बीट, मोबाइल पथक गस्त देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी महिलांची जास्त गर्दी असते त्याठिकाणी साध्या वेशातील महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचा बंदोबस्त वेगळा आहे. पोलिस दक्ष राहतीलच, महिलांनीही सावध राहावे.”
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त
ही काळजी घ्या!
- दागिने घालण्याचे टाळावे
- दागिने असल्यास पाठलाग होण्याविषयी सावध राहा
- दागिन्यांना पीन लावा, जेणेकरून ते तुटणार नाहीत
- एखादी अप्रिय घटना घडल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्या
- पत्ता विचारण्याचा बहाणा करून दागिने हिसकाण्याचा फंडा चोरांचा आहे