आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो स्टुडिओत मुलीचा विनयभंग; जमावाने केली दुकानाची तोडफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नई जिंदगी लक्ष्मीनगर परिसरातील जय फोटो स्टुडिओत फोटो काढण्यासाठी आलेल्या आठवर्षीय मुलीचा दुकानातील पंचवीस वर्षीय कामगाराने विनयभंग केला. हा प्रकार सोमवारी दुपारी बाराच्या सुमाराला घडला. यानंतर चिडलेल्या जमावाने दुकानावर दगडफेक करून साहित्याची नासधूस केली.
वैभव व्यंकटेश देशक (वय २५, रा. आसरा चौक, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी, तिचा भाऊ मित्र दुकानात फोटो काढण्यासाठी आले होते. भावाला मित्राला वैभवने बाहेर बसवले. मुलीला फोटो काढण्यासाठी स्टुडिओत नेले. त्यावेळी तिचा विनयभंग केला. मुलगी आरडाओरड करताच भाऊ मित्राने दरवाजा ठोठावला. आरडाओरड होताच जमावाने दरवाजा उघडून तरुणाला चोप दिला. दुकानाची मोडतोड करून साहित्याची नासधूस केली.
तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, नीलेश अष्टेकर, अश्विनी सानप, पोलिस निरीक्षक एच. एन. खाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. सहायक निरीक्षक मासाळ तपास करीत आहेत.