आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीबी रुग्णांची होणार सोय, ५० मेडिकलमधून होणार विनामूल्य उपलब्धता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - क्षयरोग(टीबी) रुग्णांसाठी शहरातील खासगी ५० औषध दुकानांमध्ये मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘टीबी’ चिकित्सा विभाग, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन ऑल इंडिया केमिस्ट संघटना यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक रुग्णांची औषधे मेडिकलमध्ये त्यांच्या खास बॉक्समध्ये ठेवण्यात येणार आहेत. रुग्णांना औषधे घेण्यास मिळण्यास अनेकदा अडचण निर्माण होत होती. त्यावर हा पर्याय शोधण्यात आला आहे. यामुळे डॉट्स उपक्रम समाजात अनेक लोकांपर्यंत पोहचवता येईल.

फार्मासिस्टनादिले प्रशिक्षण
क्षयरोगाच्याइलाजासाठी सरकारी डॉट्स (डायरेक्टली ऑब्झर्व्हड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स) मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत मोफत औषधे देण्यात येतात. सोलापुरातील ५० फार्मासिस्टना ‘डॉट्स’ प्रोव्हायडर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये समुपदेशन, डॉट्स संबंधी, माहितीपत्रके, भित्तीपत्रके, निरीक्षण, लक्षणे असलेल्या रुग्णांना थुंकी तपासणी केंद्रात पाठवणे. त्यांचा पाठपुरावा करून लागण शोधणे, या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

रुग्णांचे हित लक्षात घेऊनच हा प्रकल्प
-फार्मासिस्टआणि क्षयरोग विभागाच्या समन्वयाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्यामुळे टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी मदत होणार आहे. सामाजिक बांिधलकी जपत कार्य करणार आहे. त्यामुळे रुग्णांची सोय होणार असून औषधे वेळेवर मिळणार आहेत. रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.” डॉ.रूपा रायखेलकर, वैद्यकीय अधिकारी, व्ही. एम. शासकीय मेडिकल कॉलेज

मुंबई, नागपूरनंतर सोलापुरात सोय
-राज्यातमुंबई, नागपूरनंतर आता सोलापूरमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. सोलापूर केमिस्ट असोसिएशनमधील ५० फार्मासिस्टची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. विभागानुसार ही निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत ४५० हून अधिक फार्मासिस्ट प्रशिक्षित करण्यात आले आहेत. फार्मासिस्ट क्षयरोग विभागात सुसूत्रतेने काम चालू आहे.” मंजिरीघरात , उपाध्यक्ष , इंडियन फर्मासिटीकल असोसिएशन

या ठिकाणी मिळणार औषधे
युनिट : दाराशा,राहुल गांधी सोसायटी, सिव्हिल, लष्कर, फॉरेस्ट, अशोक चौक एमआयडीसी, सोरेगाव, मजरेवाडी, गुरुनानक चौक, भगवान नगर झोपडपट्टी, विजापूर रोड, रामवाडी, डोणगाव रोड. यासाठी बगाडे यांच्याशी ९८२३९५७७४५ वर संपर्क साधावा.

युनिट: पार्कचौक, देगाव, दमाणी, बुधवार पेठ, बाळे, केगाव, सम्राट चौक, करंबा नाका, दत्त चौक, कन्ना चौक, भवानी पेठ, दयानंद कॉलेज, सहकारी रुग्णालय, अक्कलकोट रोड, हैदराबाद रोड, सिद्धेश्वर पेठ या भागातील रुग्णांनी सचिन मस्के : ९९२३५७५६७३ यांच्याशी संपर्क साधावा.

-सोलापूर केमिस्ट असोसिएशन चांगल्या कामासाठी सदैव सहकार्य करते. टीबीच्या रुग्णांना नियमित औषधे घेणे आवश्यक असते. मात्र, ओपीडी काहीकाळ चालू असल्याने औषधे वेळेवर मिळत नाहीत, त्यांच्या सोयीसाठी केमिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.” मनीषबलदवा, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन