आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठ्यातील दोष शोधणार आता इलेक्ट्रॉनिक्स उपकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वादळ,पाऊस, वजिेच्या पोलला धडक बसल्यानंतर होणाऱ्या अपघातात किंवा अन्य काहीही डीपी जळणे किंवा मध्येच कुठेतरी दोष निर्माण होऊन वीज गायब होण्याचे प्रकार अनेकवेळा अनुभवास येतात. पण हा दोष कुठे आहे हे शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूपच मेहनत घ्यावी लागत होती. दुरुस्तीसाठी त्या परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित करावा लागत होता. मात्र यावर आता इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या साहाय्याने उपाय शोधण्यात आला आहे.
बिघाड तत्काळ कळणार
रिमोट टेक्निक युनिट रिंग मेन स्वीच ही दोन्ही उपकरणे डीपीच्या यंत्रणेत बसविण्यात येत आहेत. त्यात सीमकार्ड आहे. त्याद्वारे प्रत्येक डीपी कनेक्शनचे लोकेशन त्याद्वारे मिळविता येणार आहे. कंट्रोल डाटा सिक्युरिटी ही सिस्टिम महावितरणच्या जुन्या मिल कंपौंडमधील मुख्यालयात कार्यरत आहे. तेथून शहरातील २९१ उपकरणांवर अंकुश राहणार आहे. कुठेही बिघाड झाला तर या ठिकाणी तो दर्शविला जाईल. त्यामुळे नेमका कुठे दोष आहे हे समजेल तेथेच जाऊन दुरुस्ती करता येईल. त्याचा पहिला प्रयोग गुरुनानक लाइनवर करण्यात आला. या परिसरात १७ उपकरणे बसविण्यात आली आहेत.