आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संथ कासवाच्या रक्षणार्थ सशाच्या गतीने व्हावेत प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र स्थान मिळवलेल्या कासवाचे अस्तित्व विश्वाच्या प्रारंभापासून मानण्यात येते. वाढते प्रदूषण आणि औषध निर्मितीसाठी होणारी तस्करी यामुळे या उभयचराचे अस्तित्वच संकटात आले आहे. संपूर्ण जगातच कासवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्याच्या संवर्धनासाठी आजच्या दिवसाची, जागतिक कासव दिनाची सुरवात झाली आहे. प्राचीन धर्मग्रंथांमधील आख्यायिकेनुसार आपली पृथ्वी चार बलदंड गजराजांनी तोलून धरली आहे. हे चारही गजराज एका अतिप्रचंड कासवावर उभे आहेत. या कासवाला शेषनागाने आपल्या माथ्यावर धारण केले आहे. समुद्रमंथन करताना मेरू पर्वताचा भार कासवानेच पेलल्याची मान्यता आहे.