आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी नव्या जनगणनेचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येणाऱ्यामहापालिका निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार राखीव प्रभाग ठरवण्यासाठी प्रभागांची फेररचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना दिले आहेत. सोलापूर महापालिका क्षेत्रात जनगणनेच्या २००१ च्या आणि २०११ च्या आकडेवारीत फार मोठी तफावत नाही. त्यामुळे बदल प्रभागांचा की आरक्षणापुरता हे आयोगाकडून अजून स्पष्ट केलेले नाही.
यापूर्वी २००१ च्या जनगणनेची लोकसंख्या प्रमाण मानून प्रभागांची रचना करण्यात आली होती. मात्र, आता २०११च्या जनगणनेची लोकसंख्या जाहीर झाली आहे. सर्व सविस्तर आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्या आधारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीचे बदल करण्याचे निवडणूक आयोगाने ठरवले आहे. त्यासाठी २३ सप्टेंबर रोजी सर्व महापालिकांना निवडणूक आयोगांनी पत्रे पाठवून सविस्तर माहिती मागवली आहे. महापालिकांनी ही माहिती निवडणूक आयोगाला धाडली असून ज्या ठिकाणी लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत, अशा ठिकाणी प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी आरक्षणापुरतीच प्रभाग रचना बदलायची झाल्यास त्याला मोठ्या प्रमाणात हरकती येऊ शकतात. त्यामुळे नव्या लोकसंख्येचा आधार नक्की कशासाठी करावयाचा हे स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीच्या अगोदर याबाबतची स्पष्टता केली जाईल, असे सांगितले जात आहे.

वॉर्ड की प्रभाग सरकारचे धोरण ठरणार
निवडणूकआयोगाने दिलेल्या पत्रात दोन किंवा तीन सदस्य असतील असाच एक प्रभाग निर्माण करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही प्रभाग राहतील, अशी शक्यता आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने ‘एक वॉर्ड’ पद्धती अमलात आणली जाईल, अशी शक्यता वर्तवली जाते. त्यासासाठी सरकारकडून धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. पण निवडणूक आयोगाची सध्याची तयारी प्रभागांचीच दिसते आहे.