आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next To A Beauty Parlor And A Trigger Mechanism: Chavan

ब्यूटी पार्लरच्या क्षेत्राचे तंत्र पुढे नेणारे : चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आज पार्लरच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान हे अधिक पुढे गेले आहे. त्यामुळे ब्यूटिशियन्सना काम करणे सोपे आणि वेगाने पुढे नेणारे झाले आहे, असे मत ज्येष्ठ जेन्ट्स ब्यूटिशियन दामोदर चव्हाण यांनी व्यक्त केले.

शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे जय र्शीगणेश मार्केटिंगच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबईचे प्रवीण मालवणकर, प्रभाकर भालेकर, सुनंदा महाराणा, कृष्णा भाकरे, संयोजिका सुलोचना भाकरे, अंजली जाधव अभय कांती आदी मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, की गेल्या 50 वर्षांपूर्वी जे तंत्रज्ञान होते, त्यात माणसाच्या कष्टावर बरेच काही अवलंबून होते. मात्र, आता मानवाला केवळ कळ दाबणे आणि पुढे काम सरकावणे या व्यतिरिक्त काही विशेष काम नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची उमेदही वाढली आणि क्षमताही. याचा उपयोग येणार्‍या काळाला उत्तम आहे. तर मालवणकर यांनी या वेळी बाजारात प्रदर्शनासाठी आणलेल्या विविध मशीन्सची प्रात्यक्षिके देत आजचे तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय? त्या मशीन्सचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. सोलापूर व परिसरातील बहुसंख्य ब्यूटिशियन्सनी उपस्थिती लावली होती. अंजली जाधव व अभय कांती यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर भालेकर यांनी आभार मानले.