आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Rane News In Marathi, Rane Consolation Patil Family

नितेश राणे यांच्यांकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुभाष पाटील हे हाडाचे कार्यकर्ते होते. ते स्वाभिमानी परिवारातीलच सदस्य होते. त्यांच्या अकाली निधनाने आमचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. संघटनेसाठी त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरले जाणार नाही. परिवाराचा कर्ता म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक नितेश राणे यांनी सांगितले.

स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष पाटील यांचे रविवारी अपघाती निधन झाले. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंगळवारी राणे सोलापुरात आले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास राणे यांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. राणे यांनी सुमारे दीड तास कुंटुंबीयांशी संवाद साधला.

अश्विन पाटील यांच्या कुटुंबीयांना मदत राणे यांनी अश्विन पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांना 25 हजारांची आर्थिक मदत दिली. तसेच दरमहा मदत देण्याचे जाहीर केले.