आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्च कोटींचा, स्मशाने तशीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात नऊ स्मशानभूमी परिसर सुधारणा सुरू आहे. आतापर्यंत सुमारे अडीच कोटी रुपये खर्च झाले आहेत. काही ठिकाणी ६० ते ९० टक्के काम झालेले आहे. मात्र, झालेल्या कामाच्या तुलनेत केलेल्या खर्चाचा आकडा खूपच मोठा दिसत आहे. तसेच झालेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत शहरातील १० स्मशानभूमी सुधारणा करण्यात येत असून, त्यापैकी स्मशानभूमीचे काम सुरू आहे. मोदी परिसरातील ख्रिश्चन दफनभूमी, लिंगायत स्मशानभूमीचे काम प्रगतिपथावर आहे. एकूण कामासाठी ४.७१ कोटी रुपये मंजूर असून, त्यापैकी २.४० कोटी खर्च झाले आहेत. डिसेंबरअखेर सर्व कामे पूर्ण होतील.
दर्जाचे काय? : स्मशानभूमीत लाखो रुपयांची कामे सुरू आहेत. त्या कामाचा दर्जा काय आहे? स्मशानभूमीतील गरजेनुसार कामे केली आहेत का? याबाबत प्रकरणात कोठेच उल्लेख केलेला नाही. कामाचा दर्जा काय आहे? यांची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नाही.
अशी करायची आहेत कामे
योजनेत राज्य सरकार आणि महापालिका प्रत्येकी ५० टक्के रक्कम देत आहे. देगाव स्मशानभूमी वगळता इतर नऊ स्मशानभूमीचे काम सुरू झाले आहे. यात प्रामुख्याने अंत्यविधीसाठी शेड उभारणे, परिसरातील झाडे तोडणे, पाण्याची व्यवस्था करणे, दिवाबत्तीची सोय करणे, बाकडे बसवणे, विधी करण्यासाठी जागा तयार करणे आदी कामे आहेत.
थर्ड पार्टीकडून काम तपासून घेतले जाते
- नऊ स्मशानभूमीचे काम सुरू आहे. ती कामे डिसेंबरअखेर पूर्ण होतील. काम सुरू असताना थर्ड पार्टीकडून तपासणी सुरू आहे. त्यांचे अहवाल आहे. संशय असेल तर आम्ही तपासणी करू.”
तपन डंके, उपअभियंता, नगर अभियंता
कामाची चौकशी हवी
- सर्व स्मशानभूमीच्या कामाबाबत संशय येत असून, तेथील दर्जाची चौकशी त्रयस्थ तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून करावी. नगरोत्थान योजनेतून उद्यानातील कामे करण्यात आली. त्यांचीही चौकशी करावी.”
सुरेश पाटील, नगरसेवक
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, तरतूद आणि झालेले काम
बातम्या आणखी आहेत...