आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ विनापरवाना स्कूल बस जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- परवाना नसतानाही विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या नऊ बस जप्त करण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई सोमवारी केली. कारवाईमुळे अवैध स्कूल बसचालकांचे धाबे दणाणले आहेत. नियमबाह्य धावणाऱ्या दुचाकीस्वारांना धडा शिकविल्यानंतर ‘आरटीओ’ने कारवाईच्या अजेंड्यावर सोमवारपासून स्कूल बस घेतल्या. दोन स्क्रॅप रिक्षाही जप्त करण्यात आल्या.

सोमवारी सकाळी सेवासदन प्रशाला, केएलई आयएमएससारख्या आदी प्रमुख शाळांजवळ थांबून आरटीओच्या विशेक्ष भरारी पथकाने स्कूल बस तपासणी माेहीम सुरू केली. यात एकूण स्कूल बस दोषी आढळल्या. दोषी आढळलेल्या स्कूल बसचालकांकडे विद्यार्थी वाहतूक करण्याचा ‘आरटीओ’चा परवानाच नव्हता. होणारी विद्यार्थी वाहतूक ही अनधिकृत होती. ‘आरटीओ’ने बस जागेवरच ताब्यात घेतल्या. जप्त करण्यात आलेल्या स्कूल बस सोडवून घेण्यासाठी संबंधित वाहनमालकांना कोर्टाकडूनच सोडवून घ्यावे लागणार आहे. तसेच परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी त्यांना आठ ते दहा हजार रुपयांचा दंडही होणार आहे.
नियमांचे होत नाही पालन
- कागदपत्रे अन्य महत्त्वाच्या बाबी तपासल्या जाणार आहेत. जादा विद्यार्थी वाहतूक होत असेल तर कडक कारवाई.
- काही स्कूल बसने प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केलेली आहे तर काहींनी अद्याप करावयाची आहे.
- ०९ स्कूल बस वर कारवाई करण्यात आली
- २५० स्कूल बस शहरात एकूण आहेत.
याची होणार तपासणी
गाडीस स्पीड गर्व्हनर बसविणे, संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग, क्षमतेप्रमाणे विद्यार्थी वाहतूक, बसच्या पहिल्या पायरीची प्रमाण उंची, प्राथमिक उपचार पेटी, विद्यार्थिनीसाठी महिला वाहक नियुक्ती आदी बाबी तपासण्यात येणार आहेत.
कारवाई सुरूच राहील
- सोमवारी आरटीओच्या वतीने स्कूल बस स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. स्कूल बस चालकांकडून कोणतीही नियमबाह्य कृती खपवून घेतली जाणार नाही. स्कूल बसवरची कारवाई निरंतर चालू राहणार आहे.”
बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...