आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अंनिस’तर्फे मंगळवारी होणार निर्धार मेळावा; हमीद, मुक्ता दाभोलकर यांची उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास महिना लोटला तरी मारेकरी मोकाट आहेत. डॉ. दाभोलकरांचे कार्य निर्धारपणे सुरू ठेवणार आहोत. यासाठी मंगळवारी निर्धार मेळावा आयोजिला आहे.

हिराचंद नेमचंद वाचनालयातील डॉ. वा. का. किलरेस्कर सभागृहात सायंकाळी पाचला मेळावा होईल. यात ‘विवेक वाहिनी’चे प्रमुख डॉ. हमीद व कन्या मुक्ता दाभोलकर, अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा. अविनाश पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती अँड. गोविंद पाटील यांनी दिली. त्याच दिवशी दयानंद कॉलेजात सकाळी साडेअकराच्या सुमाराला दोघांचा संवाद कार्यक्रम आहे. दुपारी अंनिस कार्यकर्त्यांची बैठक आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोकाशी, बाबूराव मैंदर्गीकर, मधुरा सलवारू, उषा शहा, अंजली नानल, अशोक खानापुरे, ब्रह्मानंद धडके उपस्थित होते.