आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nirmalkumar Phadkule Award Declare To Lahane, Thakar

निर्मलकुमार फडकुले पुरस्कार लहाने, ठकार यांना जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावे दिला जाणारा साहित्यसेवेसाठीचा पुरस्कार यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत ठकार यांना, तर समाजसेवा पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे सचिव विष्णुपंत कोठे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

रविवारी सायंकाळी 5.30 वाजता डॉ. फडकुले सभागृहात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान, संभाजीराव शिंदे विद्या मंदिर व सुशील रसिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत प्रा. रा. ग. जाधव, पन्नालाल सुराणा, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. द. ता. भोसले, डॉ. बाबा आढाव, राजन खान, गिरीश कुलकर्णी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, डॉ. यू. म. पठाण, डॉ. रवींद्र कोल्हे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी प्रा. विलास बेत, डॉ. मीरइसाक शेख, प्रा. व्ही. बी. पाटील, दत्ता गायकवाड, बाबूराव मैंदर्गीकर, रविकिरण पोरे, नागेश सुरवसे आदी उपस्थित होते.