आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हवामानामुळे होणार्‍या परिणामाऐवजी माध्यमांनी दिली ऐश्वर्याला होणार्‍या बाळाची बातमी\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जागतिकीकरणावर परिणाम करणार्‍या राजकीय निर्णयांबाबत माध्यमांनी समाजाला जागरूक केले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी हितसंबध झुगारून न्यूज व्हॅल्यूपेक्षा उपयुक्तता मूल्यास प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी केले. भाई छन्नुसिंग चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व्ही. आर. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भालेराव यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. जागतिकीकरण आणि प्रसिद्धी माध्यमांची दिशा हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
सध्या टीआरपी वाढवणारे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर चॅनल्सवरून दाखवले जातात. त्याच्या पाठीमागे मोठी आर्थिक गुंतवणूक असते, हे वेळीच समजून घेण्याची गरज आहे. व्यासपीठावर रवींद्र मोकाशी, मल्लिनाथ वडजे आदी मान्यवर होते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले भालेराव