आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’वाले ‘व्हाइट कॉलर’ गुंड - नीतेश राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आम आदमी पार्टीचे लोक ‘व्हाइट कॉलर’ गुंड आहेत. माहिती अधिकाराचे अर्ज देऊन त्यांचे काही कार्यकर्ते लोकांना ब्लॅकमेल करतात. उद्योजकांना त्रास देतात, असा आरोप नीतेश राणे यांनी बुधवारी केला. अशांमुळे उद्योजक देश सोडून जातील, असा इशाराही ‘स्वाभिमान’ संघटनेच्या प्रमुखांनी पत्रपरिषदेत दिला.

राणे म्हणाले, ‘आप’वाल्यांनी दिल्लीच्या लोकांना टोप्या घातल्या. महाराष्ट्रात ते शक्य नाही. बेरोजगारी, उद्योग उभारणी याबद्दल ते काही बोलत नाहीत. केवळ आरोप करत सुटतात. अंजली दमानियांचे काल नागपुरात काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती आरक्षण देण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. आमदार विनायक मेटेंसारखे लोक स्वत:चे दुकान मांडण्यासाठी आरोप करीत सुटले आहेत. मेटेंनी प्रथम आघाडी सरकारमधून आमदारकीचा राजीनामा द्यावा. स्वत: निवडून येऊन दाखवावे. मगच बोलावे.’’ पत्र परिषदेला संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष पाटील उपस्थित होते.

भाजपवाले हिजडे
मुंबईत नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे वाभाडे काढत असताना भाजपचे राज्यातील नेते टाळ्या वाजवत बसले. ते हिजडे आहेत, अशी टीका श्री. राणे यांनी केली.

उद्धवला जमणार नाही
राणे यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. जे लोक मुंबई महापालिका सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभळणार? उद्धव ठाकरेंना सरपंचपद दिले तरी ते सांभाळू शकणार नाहीत. दिवसेंदिवस प्रकृती बारीक होत चालली आहे. त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे.