आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Approval For Solapur University Msw Course Work

कामगार अधिकारी होता येईना ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठातील सामाजिक कार्य विभागास कामगार मंत्रालयाची मान्यता नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमातून पदव्युत्तरपदवी (एमएसडब्ल्यू) घेणार्‍या विद्यार्थ्यांना कामगार अधिकारी पदासाठी अर्ज करता येत नाही. दरम्यान, विद्यापीठाने मान्यतेसाठी पाठवलेला प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे.

प्रस्तावाच्या मंजुरीसाठीस प्रयत्न सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा कुलसचिव एस. के. माळी यांनी व्यक्त केली.

विद्यापीठांतर्गत वालचंद महाविद्यालय व चंदेले महाविद्यालयात ‘एमएसडब्ल्यू’चा अभ्यासक्रम सुरू आहे. अनुक्रमे 60 व 30 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अभ्यासक्रमातील ई ग्रुप स्पेशलाईज घेतलेल्या विद्यार्थ्यांना कामगार अधिकारी म्हणूनही करिअर करता येऊ शकते. त्या इच्छुकांना कामगार मंत्रालयाकडील विभागात मुख्य सचिवांकडे नावनोंदणी करणे अपेक्षित असते. त्यासाठी अभ्यासक्रमास उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाकडून पूर्वमंजुरी घेण्याची प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे.

विद्यापीठ स्थापनेनंतर लगेच ही प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र, अनभिज्ञतेमुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. विद्यापीठ स्थापनेनंतर तब्बल 4 वर्षांनी मंजुरीची ही प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याची बाब उघड झाली. यानंतर म्हणजे 2008 पासून विद्यापीठ प्रयत्नशील आहे. मात्र, अद्यापही त्यात यश आलेले नाही.