आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवदारेंविरोधात अविश्वास ठराव, एकीकडे वाढदिवसाची धांदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजशेखर शिवदारे यांच्याविरोधात माजी आमदार दिलीप माने यांच्यासह १३ संचालकांनी मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी दिलीप माने यांनीच शिवदारे यांना सभापतिपदी बसवले होते. मात्र, मंगळवारी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला.

१३ संचालकांनी जिल्हाधिका-यांकडे दिलेल्या ठरावामध्ये, "सभापती एकाधिकारी पद्धतीने काम करतात. विश्वासात घेत नाहीत. हुकूमशाही पद्धतीने काम करतात', अशा तक्रारी केल्या आहेत. संचालक मंडळात एकूण १७ संचालक आहेत.

आतापुढे काय ? : आताजिल्हाधिकारी संचालक मंडळाची विशेष सभा बोलवतील. सभेत विद्यमान सभापती यांच्या बाजूने किती मते आहेत, हे जाणून घेतील. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास नवीन सभापती निवडीसाठी सभा बोलावतील. यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल.
चाकोते,हसापुरे यांची पुनरावृत्ती... : बाजारसमितीच्या विद्यमान सभापतीवर अविश्वास ठराव आणणे नवीन नाही. यापूर्वी बाजार समितीमध्ये तत्कालीन सभापती महादेव चाकोते उपसभापती सुरेश हसापुरे यांचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे हसापुरेंनी चाकोतेंविरुद्ध अविश्वास ठराव मांडला. आता दिलीप माने राजशेखर शिवदारे यांच्यातील वाद शमल्याने शिवदारेंविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.

आज बोलणार नाही
आजवाढदिवस असल्याने दिवसभर कार्यक्रमात होतो. बाजार समितीसंदर्भात काय घडले माहिती नाही. अविश्वास ठराव दाखल झाला असेल तर त्याची माहिती घेऊन उद्या सांगतो.'' राजशेखर शिवदारे, सभापती, सोलापूर बाजार समिती