आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Decision Till 12 February In Encroachment On Railway Land

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तूर्त १२ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, रहिवाशांचे न्यायालयाबाहेर शक्तिप्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केलेल्यांना गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळाला. सोलापूर ते टिकेकरवाडी या जुन्या मीटरगेज मार्गावर विजापूर रस्ता आणि परिसरात झालेल्या अतिक्रमणासंदर्भात गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. दिवाणी न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांनी १२ फेब्रुवारी २०१५ ही पुढील सुनावणीची तारीख दिली. यासंदर्भात न्यायालयच शुक्रवारी स्थानिक वृत्तपत्रांतून जाहीर प्रसिद्धीकरण करणार आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विजापूर रस्ता आणि परिसरातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्यांना रेल्वे विभागाने दिवसांची मुदत देत जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणी गुरुवारी तारीख होती. हा एक-दोन घरांचा प्रश्न नसून दोन हजार कुटुंबे येथे राहतात. त्यामुळे येथे सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असा युक्तिवाद अतिक्रमणकर्त्यांच्या वकिलांनी केला. यावर न्यायाधीशांनी सुनावणीची पुढील तारीख दिली.

असेआहेत दावे : प्रातिनिधिकस्वरूपात दावा क्रमांक ११७, १५२ १५४ हे असून यात १४३, १४४, १५४, १२२ ते १३८ अशा एकूण २५ दाव्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पाच वादींनी दावा दाखल केला आहे. ३१ जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान या प्रकरणी स्थगिती देण्यात आली होती.


असेही परिपत्रक आहेच
शासनाच्याएका परिपत्रकानुसार सन २००० पर्यंत वसलेल्या झोपडपट्ट्या काढता येणार नाहीत. परंतु मुंबईतील कँपा कोलाचे प्रकरणही ताजे आहे. त्यामुळे सोलापुरातील सुमारे हजार कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न कळीचा बनला आहे.

महापौरांची उपस्थिती
गुरुवारीन्यायालयात महत्त्वाचा निर्णय होईल, असे वाटल्याने सुमारे दोन हजार रहिवासी न्यायालयाच्या प्रवेशव्दारसमोर जमले होते. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर सुशीला आबुटे, नगरसेवक पैगंबर शेख, मधुकर आठवले यांचीही उपस्थिती होती. न्यायालयाने सुनावणीसाठी १२ फेब्रुवारीची तारीख दिल्याचे समजताच रहिवाशांनी परतीचा मार्ग धरला. परंतु काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

येथे आहे अतिक्रमण
विजापूरनाका झोपडपट्टी भाग २, कल्याण नगर भाग ते ३, रामवाडी, टिकेकरवाडी, होटगी स्टेशन, इरण्णा वस्ती आदी भागांवर अतिक्रमण झाल्याचे रेल्वेने म्हटले आहे. सोलापूर ते टिकेकरवाडी दरम्यान जुन्या मीटरगेज मार्गावर हे अतिक्रमण आहे.

आम्ही जागा घेणारच
सदरहूजागा रेल्वेच्या मालकीची आहे. न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत थांबण्याचे आदेश दिले आहेत. ते आम्हाला मान्य आहे. पालिका रहिवाशांकडून जो कर घेते त्या बदल्यात त्यांनी सुविधा दिल्या असतील. पण या सुविधा मिळाल्या याचा अर्थ जागा त्यांच्या मालकीची झाली असे नाही. कुर्डुवाडी येथे अशाच प्रकारे अतिक्रमण केलेली ३९ दुकाने आम्ही डिसेंबर २०१४ मध्ये काढून टाकली होती. येथेही कोणाच्या दबावाला बळी पडता आमची जागा आम्ही घेऊ. नर्मदेश्वरझा, रेल्वे अधिकारी

सहानुभूतीपूर्वकविचार व्हावा
आमचीघरे रेल्वे रूळापासून १०० ते २०० मीटरवर आहेत. यामुळे कोणालाही अडथळा होत नाही. शिवाय आम्ही पालिकेकडे रितसर कर भरतो. न्यायालयाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा पुनर्वसन करावे. शिवाजीजाधव, संयुक्त संघर्ष विकास समिती
तेथेच राहण्याची मुभा द्या, अन्यथा पर्यायी जागा द्या, अशी वादींच्या वकिलांची भूमिका आहे. अॅड. व्ही. एस. आळंगे, अमित आळंगे, रमेश कणबसकर, राजू जाधव, डी. होसमनी, संतोष होसमनी, राजेंद्र फताटे, सविता बिराजदार, संजय सुरवसे, प्रकाश अभंगे हे काम पहात आहेत.