आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Entry In Railway Ground Railway Institute Decision

आता रेल्वे मैदानावर पाऊल ठेवणे महागात, रेल्वे इन्स्टिट्यूटचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे फलाटानंतर आता रेल्वे मैदानावर पाऊल ठेवणे महागात पडणार आहे. कारण सोलापूर रेल्वे विभागाने भय्या चौकातील रेल्वे मैदानावर रेल्वे कर्मचा-यांव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या प्रवेशाला शुल्क ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

भय्या चौकाजवळील रेल्वे मैदान पूर्वी रेल्वे कर्मचा-याशिवाय इतर व्यक्ती आणि खेळाडूंना फिरणे, खेळणे आणि व्यायामासाठी मोफत होते. मात्र, आता नव्या नियमानुसार एका व्यक्तीला रेल्वे मैदानावर येण्यासाठी प्रति महिना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.भय्या चौक येथील रेल्वे मैदानावर फिरायला अथवा व्यायामासाठी जाणे महागात पडणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने एक एप्रिलपासून येथे कर्मचा-यांव्यक्तरिक्त बाहेरच्या व्यक्तीस मोफत प्रवेशास मज्जाव केला आहे. बाहेरच्या व्यक्तीसाठी प्रती महिना १०० रुपये दर आकारण्यात आला आहे.

लॉनसाठी निर्णय
रेल्वेने२५ लाख रुपये खर्चून येथे किक्रेट रासिकांसाठी चांगल्या दर्जाचे लॉन उभारले आहे. याची निगा राखणे गरजेचे आहे. बाहेरच्या व्यक्तींना कुठे तरी निर्बध राखणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राजा पटेल, सचिव,रेल्वे इन्स्टिट्यूट