आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Governments Women's Establishment To Public Commission At Solapur

अन्यायाचा मुकाबला: स्थापन होणार बिगरसरकारी महिला लोकआयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महिलांवरील अत्याचाराविरोधात गैरसरकारी स्वरूपाचे महिला लोकआयोग बनवण्यात येणार आहे. तो सरकारी महिला आयोगास पर्याय असू शकेल. यासाठी सामाजिक कार्यकर्त्या पुढाकार घेत आहेत. राज्यस्तरावर त्याची स्थापना होईल. सोलापुरात जिल्हास्तरीय लोकआयोग बनवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
चार वर्षांपासून राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष, सदस्यांची निवड झालेली नाही. यामुळे महिलांच्या बाबतीत ठोस धोरण व निर्णय घेणे, त्यांना न्याय मिळवून देणे अवघड झाले आहे. प्रयत्न करूनही सरकार याबाबत निर्णय घेत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, बचत गट, विविध सेवाभावी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर काम करणार्‍या महिला एकत्र आल्या आहेत.
राज्यातील कर्त्या
ज्येष्ठ सामाजिक नेत्या वासंती दिघे, प्रतिभा शिंदे, प्रज्ञा दया पवार, कमलाताई परूळेकर या महिला आयोगाच्या सदस्या आहेत तर पुढील कार्यप्रणाली लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी आयोगाचे अध्यक्ष, क ार्याध्यक्ष, सल्लागार, विभागीय अध्यक्ष, प्रतिनिधी, समित्या यांची निवड डिसेंबरमध्ये पूर्ण होईल.
सोलापूरच्या महिला आयोगात
सोलापूरच्या सामाजिक आणि महिलांशी निगडित असणार्‍या महिलांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने प्रा. ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा आहे. तर विविध प्रकारच्या झोपडपट्टी विभागात काम करणार्‍या तळागाळातील महिलांना न्याय देणार्‍या महिलांचा यात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावरही या महिलांना सोलापूरचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.
लोकआयोग घालणार सोलापूरच्या प्रकरणात लक्ष
सोलापुरात नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या तीन सामूहिक बलात्कार प्रकरणात लक्ष घालण्यात येईल. प्रकरणात नेमके काय घडले, त्याची सद्यस्थिती काय, महिलांना काही आधार देण्यात आला आहे का? असे अनेक मुद्दे आयोग स्वत: पाहणार असल्याची माहिती अँड. वर्षा देशपांडे यांनी दिली. त्यांनी सोलापुरातील लोकआयोगासाठी पुढाकार घेतला आहे.
न्यायासाठी महिलांनी जागे होण्याची गरज
वारंवार ज्या घटना घडत आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. पुरोगामी सरकार हाताची घडी घालून बसले आहे. त्याला काही करता येत नसेल तर आम्ही जे ठरवू त्यास संमती देण्याचे सोपे काम तरी त्यांनी करावे. मात्र या महिला लोकआयोगाच्या माध्यमाने महिलांना न्याय मिळवून देण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे.
- अँड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या, महिला लोकआयोगाच्या प्रणेत्या, सोलापूर