आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Marriage Muhurt Till 24th November After June

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुहूर्त नसल्याने विवाहांना पाच महिन्‍यांसाठी ‘रेड सिग्नल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विवाहेच्छुकांना आता 29 जूननंतर किमान पाच महिन्यांसाठी ‘रेड सिग्नल’ मिळणार आहे. जूनअखेरपर्यंत 13 मुहूर्त आहेत. 6 जूनला शुक्राचे अधिक्रमण आहे. 30 जूनपासून चतुर्मास सुरू होत आहे. पुन्हा विवाहाच्या सनया वाजण्यास 24 नोव्हेंबर उजाडणार आहे. 20 जूनला आषाढ सुरू होत आहे.
30 जूनला आषाढी एकादशी असून त्याच दिवशी चतुर्मास सुरू होईल. त्यात भाद्रपद अधिकात आलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबरला चतुर्मास संपतो. मे व जूनमध्ये गुरू व शुक्राचा अस्तंगत कालावधी असल्यामुळे दरम्यानच्या काळात मुहूर्त नव्हते. आता 6 जूननंतर शुक्र अधिक्रमण आहे. त्यामुळेही जून महिन्यात उशिराने मुहूर्त आहेत.
अधिक्रमण म्हणजे...
बुध व शुक्र हे अंतर्ग्रह आहेत. या ग्रहांची भ्रमणकक्षा पृथ्वी व सूर्य यांच्यामधून जाते. सूर्यग्रहणामध्ये सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो. तसेच सूर्य व पृथ्वी यामधून काही वेळा बुध किंवा शुक्र जात असतात. काही वेळा बुध किंवा शुक्र यांचा भ्रमण मार्ग सूर्यबिंबावरून जातो. अशा वेळी ही घटना आपल्याकडे दिवसा होत असेल, तर बुध किंवा शुक्र सूर्यबिंबावरून जाताना दिसतात. यालाच बुध अधिक्रमण किंवा शुक्र अधिक्रमण म्हणतात. हे अधिक्रमण 6 जून 2012 ला होणार आहे.