आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींमध्ये बलात्कार होत नाहीत : राणी बंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली-‘आदिवासी कधीच चो-या करत नाहीत, त्यांच्यात कधी बलात्काराचे प्रकार होत नाहीत. ख-या अर्थाने त्यांनी सहजीवनाची मूल्ये जपली आहेत,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी रविवारी व्यक्त केले.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठातर्फे देण्यात येणाºया भावनिक एकात्मता व कर्मयोगिनी पुरस्काराने राणी बंग यांना सन्मानित करण्यात आले, या वेळी त्या बोलत होत्या. गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राणी बंग म्हणाल्या की, आदिवासींना आम्ही जेवढे दिले; त्यापेक्षा त्यांनी आम्हाला खूप काही दिले. त्यांनी मानवी नात्यांबरोबरच निसर्गाशी, झाडांशी, वन्यप्राण्यांशी नाते जपले. त्यांच्यात आजही सामूहिक निर्णय घेतले जातात. आजचा सुधारलेला समाज त्यांना मागास म्हणतो; पण या लोकांमध्ये कधीच बलात्काराचे प्रकार घडत नाहीत.’
आई म्हणाली ‘नापास हो’
‘या पुरस्काराने मला आईची आठवण झाली. एकदा आईने मला ‘नापास हो’ असे सांगितले. त्या वेळी मला खूप राग आला; पण अपयशही पचवता आले पाहिजे असे तिचे तत्त्व होते,’ अशा भावना बंग यांनी व्यक्त केल्या.