आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या प्रभागात पाण्याची बोंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापौर अलका राठोड यांच्या प्रभागातील माशाळ वस्तीसह लष्कर, हत्तुरे वस्ती आदी भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने त्या भागातील महिलांनी झोन कार्यालय, महापौर आणि आयुक्त कार्यालयात जाऊन जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असताना, पाणीपुरवठा अधिकारी मात्र ढिम्म आहे.


माशाळ वस्तीत अवेळी पाणी
महापौर अलका राठोड यांच्या प्रभागातील माशाळ वस्ती, आत्मविश्वास नगर, योगीराजेंद्र नगर, पापाराम नगर भागात अवेळी पाणीपुरवठा होत आहे. रात्री 12 वाजता पाणी येत असल्याने महिला आणि अपंग व्यक्तींना त्रास होत आहे. बहुतेक घरांत पाणी खेचण्यासाठी टिल्लू मोटार असल्याने काही ठिकाणी पाणी येत नाही. त्यामुळे त्या परिसरातील सतीश दरेकर, अर्जुन माशाळ, गोविंद पवार, तुषार स्वामी, रुक्मिणी माशाळ, र्शीनिवास बुरूडकर, सरस्वती गोसावी, शारदा कोथळे आदींनी महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांच्या कार्यालयात जाऊन पाण्याच्या गार्‍हाणी मांडल्या. त्यानंतर महपौर राठोड यांच्याकडे तक्रारी मांडल्या.


हत्तुरे वस्ती परिसरात पाणी नाही
हत्तुरे वस्ती परिसरात पाणी नसल्याने त्या परिसरातील महिलांनी झोन कार्यालय क्रमांक पाच येथे मोर्चा नेला. पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर झोन अधिकारी नीलंकठ मठपती यांनी हत्तुरे वस्ती परिसरात पाणी पुरवठय़ाचे नियोजन केले.


लष्कर परिसरातही त्रस्त महिला घुसल्या झोन कार्यालयात
लष्कर परिसरातील काही महिलांनी झोन क्रमांक आठमध्ये जाऊन पाण्याच्या तक्रारी मांडल्या. यावेळी झोन अधिकारी वीरभद्र रेगळ कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याने ते अनभिज्ञ होते.

नगरसेवकांच्या हॉटेलसाठी पाण्याची गळती!
उजनी ते सोलापूर दरम्यान असलेल्या जलवाहिनीला केगाव जवळील हॉटेल विनयजवळ गळती आहे. सदरचे हॉटेल नगरसेवक विनायक कोंड्याल यांचे आहे. त्यामुळे तेथील गळतीकडे मनपा अधिकरी दुर्लक्ष करत आहेत. बांधकामासाठी गळतीची ‘सोय’ असल्याचा संशय शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, सदानंद येलुरे, रेवण बुक्कानुरे आदी उपस्थित होते. पाण्याची गळती असेल तर महापालिका आयुक्तांनी ती त्वरित थांबवावी, असे मत नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी मांडले.