आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Veg Party In Government Building For Transfering BDO

बीडीओ बदलीच्या आनंदात शासकीय इमारतीत मटण पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा (जि. सोलापूर) - मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांची नाशिक येथे पदोन्नतीवर बदली झाली. त्यानिमित्त बोकडाचा बळी देऊन मटणाच्या जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने टीकेचा सूर उमटत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी या घटनेची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी केली आहे.

मंगळवेढा पंचायत समितीच्या शेजारी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात बचत गटासाठी दोन मजली नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी पंचायत समितीला पुण्याच्या आयुक्तांनी तीन महिन्यांआधी पत्रही दिले होते. उद्घाटनासाठी मात्र अद्याप मुहूर्त सापडला नाही.

गटविकास अधिकारी दराडे यांच्या बदलीनिमित्त बोकडाच्या मटणाची मेजवानी देण्यात आली. बचत गटाच्या नूतन इमारतीच्या खुल्या आवारातच बोकडाचा बळी देऊन मटण शिजवण्यात आले. त्यानंतर भोजनावळी इमारतीमध्ये झाल्या. इमारतीच्या उद््घाटनापूर्वीच बोकडांचा बळी दिल्याने या प्रकाराची खमंग चर्चा मंगळवेढ्यात दिवसभर सुरू होती.