आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Folding Hand For Helping The Drought Suffared People : Chief Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्तांसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्‍यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थतीमुळे चारा छावण्या, मागेल त्या गावात पाणी टँकर पुरवठा करण्यात येत आहेत. वरिष्ठस्तरावर नियोजन सुरू आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळ नियोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.


तुळजापूर येथे जाण्यासाठी विशेष विमानाने मुख्यमंत्री चव्हाण यांचे सोलापूर येथे शनिवारी आले होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सहकारामंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, उजनी धरणात पाणी कमी आहे. उपल्बध पाण्यात नियोजन सुरू आहे. दोन पावसाळयात मोठा पाऊस झाला तरच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. चारा छावण्या, पाणी टँकर पुरवठा सुरू आहे. आणखी कोणी मागणी केल्यास त्यांना तत्काळ या सुविधा देण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.