आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notic Issueing Against Electricity Company Engineer Pathan

वीज कंपनीचे अभियंता पठाण यांच्याविरुद्ध ‘प्रोसेस इश्यू’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्हाधिका-यांच्या सूचनेनंतरही अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या भरतीप्रक्रियेतील मुलाखत घेण्यासाठी उपस्थित न राहिल्यामुळे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता (ग्रामीण विभाग) अर्शदखान पठाण यांच्याविरुद्ध पाच जून रोजी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी पठाण यांच्याविरुद्ध प्रोसेस इश्यू जारी करून एक महिन्याच्या आत न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली. मुलाखत घेण्यासाठी पठाण उपस्थित न राहिल्यामुळे भरती प्रक्रिया स्थगित करावी लागली आहे. या प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आणि पठाण यांच्यात वाक्युद्ध रंगले होते. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आहेत. समितीमध्ये आठ अधिकारी सदस्य असतात. शासन निर्देशानुसार अल्पसंख्याक समाजाचा एक सदस्य असणे गरजेचे असते. त्यासाठी अर्शदखान पठाण यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांना पत्रही पाठवण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुलाखती स्थगित कराव्या लागल्या. जिल्हाधिका-यांचा आदेश न पाळल्याने तसेच बैठकीस उपस्थित न राहिल्याने मनीषा देसाई यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. न्या. गौड यांनी पठाण यांना एक महिन्याच्या आत न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. संतोष शिंदे काम पाहत आहेत.


तुकाराम कासार आणि पठाण यांच्यात वाक्युद्ध रंगले होते. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आहेत. समितीमध्ये आठ अधिकारी सदस्य असतात. शासन निर्देशानुसार अल्पसंख्याक समाजाचा एक सदस्य असणे गरजेचे असते. त्यासाठी अर्शदखान पठाण यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांना पत्रही पाठवण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुलाखती स्थगित कराव्या लागल्या. जिल्हाधिका-यांचा आदेश न पाळल्याने तसेच बैठकीस उपस्थित न राहिल्याने मनीषा देसाई यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. न्या. गौड यांनी पठाण यांना एक महिन्याच्या आत न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. संतोष शिंदे काम पाहत आहेत.