आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Notice Issued To The Asisatant Commissioner And Other Officers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहाय्यक आयुक्तांसह अधिकार्‍यांना नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका स्थायी समितीच्या अंदाजपत्रकीय सभेत अधिकार्‍यांनी सदस्यांना समाधानकारक उत्तर न दिल्याने साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे, अजित खंदारे, नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्यासह 15 अधिकार्‍यांना आयुक्त अजय सावरीकर यांनी शुक्रवारी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.

गुरुवारी झालेल्या सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक खुलासा मागत होते. अधिकार्‍यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी आयुक्तांना उत्तरे द्यावी लागली. सभेला येताना अपूर्ण माहिती आणल्याच्या कारणावरून सर्व विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. खुलासा आल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तो आयुक्तांकडे पाठवण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त (प्रशासन) अजित खंदारे यांनी सांगितले.