आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेतील दोषींना ‘आत’ बसवू!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालकांनी केलेल्या कारभाराची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासकीय कारवाईबरोबरच दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करून ‘आत’ बसवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. कृषी कर्जापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न झाले तर संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

एका कार्यक्रमासाठी सोमवारी ते सोलापूरला आले होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमधील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकांनीच स्वत:च्या कारखान्यांसाठी कर्जे लाटली, त्याची वसुली होत नाही. त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत अाली. परिणामी शेतकऱ्यांना कृषी कर्जे मिळत नाहीत. यावर काय कारवाई करणार? या प्रश्नावर ते म्हणाले, “बँकेतील कारभाराची चौकशी सुरू आहे. कलम ८३ आणि ८८ अन्वये चौकशी झाल्यानंतर दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करू.”

दीपकआबानिघून गेले :कार्यक्रमानंतर पत्रकारांनी सहकारमंत्री पाटील यांना गराडा घातला. त्या वेळी जिल्हा बँकेचे संचालक आमदार दीपक साळुंखे शेजारीच थांबले होते. ऊसदर, केंद्र आणि राज्याकडून मिळणारी मदत यावरील प्रश्नोत्तरानंतर जिल्हा बँकेचा विषय निघाला. त्या वेळी श्री. साळुंखे लगेच निघून गेले.

मंत्र्यांचे केवळ इशारेच
पूर्वीच्याकाँग्रेस आघाडी सरकारमधील सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जेव्हा सोलापूरला यायचे, त्या वेळी जिल्हा बँकेबाबत गंभीर वक्तव्य करून जायचे. प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नव्हती. सत्तांतरानंतर चंद्रकांत पाटील सहकारमंत्री झाले. त्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरला आले. जिल्हा बँकेविषयी नुसतेच इशारे देऊन गेले.
बातम्या आणखी आहेत...