आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब खाआे ‘झेडपी’ के अंडे,‘पशुसंवर्धन’कडून थेट विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या अंडी उबवण केंद्राने शहरात थेट विक्री सुरू केली. बाजारभावापेक्षा कमी दरात, मिळत असल्याने प्रतिसाद आहे. जुळे सोलापुरातील चैतन्य नगर मंडईच्या चौकामध्ये हातगाडी उभी केली आहे. त्यावर पशुसंवर्धन विभागाचा फलक आहे.

विजापूर रस्त्यावरील नेहरूनगर येथे उबवणी केंद्र आहे. तेथे ११०० कोंबड्या असून रोज सुमारे एक हजार अंडी देतात. दर आठवड्याला २२०० पेक्षा जास्त पिल्लं काढण्यात येतात. वैयक्तिक लाभ योजनेतून ५० टक्के अनुदानावर प्रामुख्याने महिलांसह विविध घटकांनान देण्यात येतात. यात निम्मी अंडी उबवण्यात येतात. शिल्लक शीतकेंद्रात ठेवतात. उन्हाळ्यात जास्त अंडी ठेवता येत नाहीत. बहुतांश खराब होतात. त्याच करायचे काय? असा प्रश्न पशुसंवर्धन विभागापुढे होता. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी शिल्लक अंडी बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. २५ एप्रिल रोजी जागतिक पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने अंडी विक्री सुरू केली. पशुखाद्य नेण्यासाठी वापरण्यात येणारी हातगाडीची किरकोळ दुरुस्ती केली अन् त्यामध्ये अंड्यांचे ट्रे ठेवून ते विक्रीसाठी बाजारात आणले.

पशुसंवर्धन विभागातर्फे सुरू केलेले अंडी विक्री केंद्र.
‘गिरीराज’ जातीच्या कोंबड्यांची अंडी शासकीय दराने विकण्यात येत आहे. तीन रुपयांस एक आहे. बाजारभावापेक्षा कमी दर असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. चार दिवसांपासून विक्री सुरू असून रोज किमान ४०० पेक्षा जास्त अंड्यांचा खप झाला.


उत्पन्नवाढीचा अभिनव प्रयोग
जिल्हापरिषदेच्या उत्पन्नात वाढ होणारा अभिनव प्रयोग पशुसंवर्धन विभागाने सुरू केला आहे. अंडी विक्रीतून मिळालेले पैसे चलनाने शासनाकडे जमा होतात. त्याचप्रमाणे अंडी घालण्याचा कालावधी संपल्यानंतर कोंबड्यांची विक्री होते. त्याचेही उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने अंडी उबवण केंद्रामध्ये रोजंदारीवर कामगारांची नियुक्ती केली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या वेगळ्या उपक्रमातून उत्पन्न मिळते, हे काही कमी नाही.

अंडी खराब होण्यापेक्षा शासकीय दराने विक्री करून उत्पन्न वाढविण्याचा पहिलाच प्रयोग पशुसंवर्धन विभागाने केला आहे. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मागणी वाढल्यास विक्री केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. तसेच, व्यापाऱ्यांना थेट विक्रीही करण्यात येईल.” डॉ.किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
बातम्या आणखी आहेत...