आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रीमंत दामोदरपंत’ आता येणार रूपेरी पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या श्रीमंत दामोदरपंत या नाटकाचे रूपांतर आता रूपेरी पडद्यावर साकारले आहे. लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या कल्पक लेखन दिग्दर्शनातून सादर झालेले हे नाटक चित्रपटाच्या स्वरूपात रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

कॉट्सटाऊन पिक्चर्स प्रा. लि., चे बॅनर असून सौरभ प्रधान निर्माता आहे. श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटात भारत जाधव यांच्यासोबत विजय चव्हाण, अलका कुबल-आठल्ये यांची भूमिका आहे. पीयूष रानडे, चैत्राली गुप्ते, मृणाल दुसानिस, जयराज नायर, वरद चव्हाण, अभिनय सावंत आणि सुनील बर्वे आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. बालकलाकर म्हणून दुर्गेश नाबर, हिमानी विहारवाला, गायत्री गोडबोले, राजेश घायल, उत्सवी लहाने आदी कलाकार आहेत. श्रीमंत दामोदरपंतची पटकथा ओंकार मंगेश दत्त यांनी लिहिली आहेत. वैभव जोशी यांचीच गीतेही आहेत. या चित्रपटात सोनू निगम आणि अभिजित कोसंबी या गायकांच्या आवाजात संगीतकार वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी गीतरचना स्वरबद्ध केल्या आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस या सिनेमाद्वारे मोठय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे.


आता नव्या रूपात
श्रीमंत दामोदरपंत हे नाटक म्हणजे दामू या साध्याभोळ्या तरुणाची कथा.. सायंकाळपर्यंत अत्यंत साध्याभोळ्या स्वभावाचा दामू घडाळ्यात सहाचे टोल पडले की कशा प्रकारे आक्रमक होतो. तोच प्रकार या सिनेमात नव्या रूपात आणि नव्या ढंगात पाहायला मिळणार आहे. श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटात भरत जाधवच ही भूमिका साकारत आहेत.

उद्यापासून प्रदर्शित
26 जुलै रोजी प्रदर्शित होणार्‍या श्रीमंत दामोदरपंतचे चित्रीकरण मुंबई, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी करण्यात आले आहे. याचे छायांकन संजय मेमाणे, अनिल कटके यांनी केले असून कलादिग्दर्शन महेश गुरुनाथ कुडाळकर यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले, सलील अमृते यांचे आहे. संकलन व्ही. एन. मयेकर आणि परेश मांजरेकर यांनी केले आहे.