आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ntpc Electricity Project Work In Progress Solapur

‘एनटीपीसी’ची चिमणी पोहोचली 160 फुटांवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - फताटेवाडी-आहेरवाडी परिसरात केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयातर्फे उभारण्यात येत असलेला एनटीपीसीचा प्रकल्प ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्णत्वाकडे जात आहे. मार्च 2016 रोजी 660 मेगावॉट वीजनिर्मितीचे पहिले युनिट सुरू होईल. त्यासाठी चिमणीचे 160 फुटांपर्यंतचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती एनटीपीसी सोलापूरचे व्यवस्थापक प्रदीप बेहरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

सध्या एनटीपीसी प्रकल्प स्थळावर प्रशासकीय कार्यालये, आयटीआय व प्रकल्पासाठीचे विविध विभाग उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला 9 हजार 921 कोटींचा हा प्रकल्प आज घडीला 10 हजार कोटींवर आहे. ही वाढ फारशी नाही. 2 जून 2012 रोजी प्रकल्प स्थळावरील कामांना सुरुवात झाली होती. एकूण प्रकल्पाचे आतापर्यंत 22 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2014 पर्यंत 30 टक्के तर 2015 ला 30 टक्के अशा पद्धतीने 2016 पर्यंत ते पूर्णत्वाला जाणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या वेळानुसारच हे काम होत आहे.

प्रकल्प स्थळावर चालू आहेत ही कामे
वॉटर ट्रीटमेंट काम (आयओएन एक्स्चेंज ही कंपनी हे काम करतेय)
कूलिंग टॉवर (यात चार टॉवर उभारले जाणार आहेत)
800 टन वजनाच्या टर्बाईन जनरेटरसाठी फौंडेशन
पॉवर हाऊस (ग्रीडच्या कनेकिं्टगसह)
112 किलोमीटरची उजनीपासूनची पाइपलाइन (सध्या 52 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे.

आयटीआयची तिसरी बॅच
येथील आयटीआयमध्ये इलेक्ट्रिफिकेशनमधून 42, फिटरसाठी 42 व वेल्डर कोर्ससाठी 23 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ही तिसरी बॅच असून 2011 रोजी पहिली बॅच बाहेर पडली. ऊर्जा मंत्रालयाच्या एनआयआयटीतर्फे हे प्रशिक्षण चालवले गेले पाहिजे. पण सध्या एनटीपीसीच्या सहकार्याने ते चालू आहे. आणखी दोन वर्षे ते चालवले जाईल, नंतर एनआयआयटी याबाबत निर्णय घेणार आहे.

बीजीआर कंपनीमुळे थोडासा विलंब
चिमणी उभारणीचे काम चेन्नई येथील बीजीआर कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर कंपनीचे प्रमुख बी. जी. रघुपती यांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवस काम रखडले होते, पण आता कंपनीच्या व्यवस्थापनाने गती वाढवून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही चिमणी एकूण 275 फुटांची राहील. त्यामुळे पर्यावरणावर काहीही परिणाम होणार नाही.

2016 ला वीजनिर्मिती
मधल्या काळात काही टेंडरबाबतचा वाद न्यायालयात गेल्याने काहीसा विलंब झाला होता, पण आता सर्व टेंडर जवळपास निश्चित झालेले आहेत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे टप्पे ठरले आहेत, त्या टप्प्याने सध्या काम पूर्ण होत आहे, त्यामुळे 2016 ला पहिल्या युनिटची वीजनिर्मिती होईल असा विश्वास आहे.’’ प्रदीप बेहरे, व्यवस्थापक , एनटीपीसी, सोलापूर