आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनटीपीसीने ७६९ शेतकऱ्यांना दिली सुमारे ७८ कोटी भरपाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एनटीपीसीआणि शेतकरी यांच्यामध्ये संमतीने संपादन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. संपादित केलेल्या जमिनीपोटी शेतकऱ्यांना बाजारभावानुसार कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागत होते. शेतकरी आणि कंपनीने चर्चा करून ही प्रक्रिया पूर्ण केली.
जमिनीचा मोबदला म्हणून ७६९ शेतकऱ्यांना ७८ कोटी ७९ लाख रुपये देण्यात आले. पुनर्वसन पॅकेज म्हणून १५ कोटी ८५ लाख रुपये देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्यानंतर करारावर सह्या केल्या आहेत. आता कंपनीचे काम पूर्ण होत असताना पुन्हा आंदोलन होत आहे. याबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पुनर्वसन पॅकेज म्हणून ९२ कोटी ५४ लाख रुपये कंपनीने अदा केले आहेत. तरीही कंपनीसमोर शेतकरी आंदोलन करीत आहेत. याबाबत शासनस्तरावर जो निर्णय होईल, त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नावाखाली कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुंढे यांनी दिला.

पात्रतेनुसार नोकरी

शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्या कंपनीने नाकारल्या आहेत. पुनर्वसन पॅकेजपोटी ज्या रकमा देय होत्या त्या सर्व रकमा शेतकऱ्यांना दिल्या आहेत. यापूर्वी संबंधित मंत्र्यांकडे लावलेल्या बैठकीत एनटीपीसी अधिकारी यांचे म्हणणेच ऐकून घेत नाहीत, शेतकऱ्यांकडून होत असलेल्या अवास्तव मागण्या असून त्या कोणत्याही नियमात बसत नाहीत तरीही एनटीपीसीकडून एका शेतकऱ्यास लाख रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबास पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करण्यात येईल. यासाठी कंपनीच्या अटी उमेदवारास पूर्ण कराव्या लागणार आहेत.

एनटीपीसीने दिलेल्या रकमा

संपादित हजार ८९१ एकर जमिनीपोटी ७६९ शेतकऱ्यांना ७८ कोटी ६९ लाख रुपयांचे वाटप करण्यात अाले. पुनर्वसन पॅकेजअंतर्गत प्रकल्पग्रस्त म्हणजेच सात-बारा उतारा असलेल्या कुटुंबप्रमुख असलेल्या ७२६ जणांना लाख रुपयेप्रमाणे १३ कोटी ९४ लाख, शेतमजूर असलेल्या ९५ जणांना ५० हजारप्रमाणे ४६ लाख तर घर, गोठा स्थलांतर यासाठी ९९ जणांना कोटी ४८ लाख दिले. रक्कम घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी करारपत्रकावर सह्या केल्या आहेत.

शासन आदेशाची अंमलबजावणी

शासन आदेशानुसार प्रकल्प परिसरात प्रवेशबंदी कलम लागू केले आहे. आंदोलकाकडून प्रकल्प इमारत वा इतर साहित्यांचे नुकसान केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. कायदा हातात घेणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी