आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज: अश्विनी’त न्यूक्लिअर मेडिसीनची सुविधा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रुग्णसेवेतील आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणारे ‘न्यूक्लिअर मेडिसीन विभाग’ सुरू करण्याचा मानस अश्विनी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल यांनी व्यक्त केला. त्यासाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयाची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी गुजराती मित्र मंडळाच्या सभागृहात झाली. माजी खासदार आणि रुग्णालयाचे प्रेसिडेंट गंगाधरपंत कुचन अध्यक्षस्थानी होते. रुग्णालयाच्या प्रगतीचा आढावा घेताना र्शी. पटेल यांनी गुलबग्र्यातील विस्तारित रुग्णसेवेची माहिती दिली. पुण्या-मुंबईच्या धर्तीवरील रुग्णसेवा देताना, न्यूक्लीअर मेडिसीन अत्यावश्यक आहे. त्यासाठीची मुख्य अडचण म्हणजे जागा. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जागा ताब्यात मिळाल्यानंतर हा विभाग सुरू होईल, असे ते म्हणाले. एम. एम. पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रथम वर्ष एमबीबीएसचा निकाल 89 टक्के लागला. राज्यातील खासगी महाविद्यालयांच्या तुलनेत हा क्रमांक पहिला आहे. त्याबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त र्शी. पटेल यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी संचालक दत्तात्रय सुरवसे, डॉ. सिद्धेश्वर रूद्राक्षी, डॉ. विजय रघोजी, डॉ. विद्यानंद चव्हाण, संजीव पाटील, र्शीमती यशोदाबाई डागा, अशोक लांबतुरे, चंद्रशेखर स्वामी, डॉ. पुरणचंद्र पुंजाल, पद्मा सोमनमर्डी, दशरथ देवकर, माजी उपाध्यक्ष डॉ. उमाकांत वरेरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली, वीरेंद्र चिप्पा, प्रकाश मलजी, मनोहर तेलसंग, अभय पल्ले आदी उपस्थित होते. डॉ. विजय पाटील यांनी आभार मानले.

न्यूक्लिअर मेडिसीनची सुविधेची विशेष म्हणजे या उपचारपद्धतीत रेडिओअँक्टिव्ह पदार्थांचा वापर रोगनिदान आणि त्यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

न्यूक्लिअर मेडिसीनची वैशिष्ट्ये
संपूर्णपणे वातानुकूलित, अत्याधुनिक उपकरणे
अचूक निदान करणारी यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर्स
रुग्णावरील उपचाराच्या नोंदी संगणकावरच
शस्त्रक्रिया विभागात अत्याधुनिक यंत्रांचा वापर
तातडीचे आणि क्लिष्ट बनलेले उपचार नेमके होते
किचकट शस्त्रक्रियांमध्ये संगणकाचा वापर
ऑनलाइन पद्धतीने संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन