आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंबर प्लेट बदलणार सोमवारपासून..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुचाकी, चारचाकी वाहनांचे नंबर आणि प्लेट शासकीय नियमानुसार रंगवण्याची सक्ती सोमवारपासून होणार आहे. प्लेटला पांढरा रंग तर नंबर काळय़ा रंगात व मोठय़ा स्वरूपात लिहिण्यासाठी शनिवार व रविवार दोन दिवस वाहन चालकांना सूचना देणार आहे. सोमवारी प्रत्यक्षात दुचाकी थांबवून जागेवरच नंबर प्लेट रंगवून देणार आहेत. फॅन्सी नंबर प्लेटमुळे एखादा अपघात झाला, वाहतूक शाखेचा नियम तोडून गेल्यास वाहनचालकावर कारवाई करता येत नाही. स्पष्टपणे व ठळक अक्षरात नंबर दिसावेत. यासाठी नंबर प्लेट रंगवण्याची मोहीम सुरू होणार आहे. याशिवाय वाहनांची कागदपत्रेही जवळ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार भवन चौकातील सिग्नल चालू
शुक्रवारी पत्रकार भवन चौकातील सिग्नल प्रत्यक्षात कार्यान्वित झाला आहे. वाहतूक पोलिसांनी चौकातील दिवे चालू ठेवून वाहतूक नियोजन केले. याशिवाय आसरा, महावीर, गांधी नगर, रंगभवन, डफरीन, सरस्वती चौकांतील सिग्नल सकाळी व सायंकाळी दोनही वेळेत सुरू होते.

आत्राम यांनी दिल्या पोलिसांना कानपिचक्या
सिग्नल चौकात सकाळी व सायंकाळी दोनही वेळांत सिग्नल चालू ठेवा. चौकात थांबून वाहतूक नियोजन करा. जे वाहनधारक नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा. न थांबल्यास नंबर टिपून घ्या. त्या आधारे दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात येईल. सक्षमपणे काम न केल्यास कारवाई करू, अशा कानपिचक्या एसीपी आत्राम यांनी पोलिसांना दिल्या आहेत.


मंडईत बसण्याची सक्ती
लक्ष्मी मार्केटमधील भाजी व फळ विक्रेत्यांना मंडईत बसण्यासाठी सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांत या ठिकाणी मोहीम राबवून विक्रेत्यांना मंडईत बसण्यासाठी सक्ती केली जाईल. रस्ता मोकळा झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी होणार नाही. वाहनधारकांनी नियमानुसार दुचाकी व चारचाकी वाहनांचे नंबर प्लेट तयार करून घ्यावेत. सोमवारपासून मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.’’ मोरेश्वर आत्राम, सहाय्यक पोलिस आयुक्त


चौकातील पोलिसांकडे वॉकीटॉकी नाहीत
शहरातील सिग्नल यंत्रणा असलेल्या अकरा चौकातील पोलिसांना वॉकीटॉकी देण्यात येतील अशी घोषणा, श्री. आत्राम यांनी केली होती. सुरुवातीला काही दिवस मुख्य चौकातील पोलिसांना वॉकीटॉकी दिली. पण काही दिवसांपासून वॉकीटॉकी पोलिसांकडे दिसत नाही. शुक्रवारी ती सरस्वती चौकातील पोलिसांकडेच होती. अन्य चौकातील पोलिसांकडे नव्हती. याबाबत माहिती घेतली असता तांत्रिक कारणामुळे वॉकीटॉकी बंद असल्याची माहिती मिळाली. किमान सिग्नल चौकातील पोलिसांना ही सुविधा देण्यात यावी.