आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारीनंतर परिचारिकेची यवतमाळला झाली बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय रुग्णालयाच्या दंत विभागातील परिचारिका रूथ कलबंडी यांच्याविरोधात तक्रार आल्यानंतर त्यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली. कलबंडी यांच्याकडून मानसिक दडपण येत असल्याची त्या डॉक्टरांना त्रास देत असल्याची तक्रार "मार्ड'च्या डॉक्टरांनी केली होती. ‘दिव्य मराठी’त यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

संघटनेतील पद आणि राजकीय वजन वापरून आरडाओरड करून कलबंडी या दबाव आणतात, अशी तक्रार डॉ. ज्योती गोरसे डॉ. स्मिता राठोड यांनी केली होती. या तक्रारीनंतर ही बदली झाल्याचे मानले जात आहे.

रोष बाळगून बदली, संघर्षाची तयारी
रूथकलबंडी यांची बदली प्रशासनातील दोष दाखवल्याचा रोष मनात ठेवून केली. बदलीचा आदेश सप्टेंबरलाच झाला. पण, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याचे पत्र दिले. यामागे राजकीय डाव दिसून येतो. संघटना मोडकळीस आणण्याचा उद्देश स्पष्टच होतो. यापूर्वीच्या अधिष्ठाता, मेट्रन यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. त्यांची दखलच घेतली गेली नाही. पण दोन शिकाऊ डॉक्टरांच्या तक्रारीने (‘मार्ड’ नव्हे) बदली होते. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. बदली रद्द करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारीही केली.” अशोक इंदापुरे, राज्यसरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक