आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदृढ आरोग्यासाठी सकस अन्नाची आहे गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतासारख्या विकसनशील देशात अन्ननिर्मितीपासून त्याचे सेवनापर्यंतच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दूषितपणा दिसून येतो. शेतामध्ये कीटकनाशकांचा अतिप्रमाणावर वापर, पीक आल्यानंतर त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर, तसेच चुकीच्या पध्दतीने साठा अशा सर्व बाबी अन्नापासून होणा-या आजाराला कारणीभूत ठरत आहेत. असुरक्षित अन्न सेवनामुळे २०० दशलक्ष आजार उद्भवतात. तर, २.२ दशलक्ष लोकांचा मृृत्यू अशा प्रकारच्या अन्न सेवनामुळे होतो. ही बाब लक्षात घेऊन चांगल्या अन्नासाठी सर्वसामन्य लोकांपर्यंत पाेहोचविण्यासाठी यंदा शासनाने जागतिक आरोग्य िदनाची थीम अन्न सुरक्षा-शेतापासून ताटापर्यंत ठरवली आहे.
एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्यात येतो. भारतासारख्या विकसनशील देशात अन्न सुरक्षेसंदर्भात म्हणावी तशी जागृती नाही. देशाप्रमाणे सोलापूर शहरातही या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. अन्न सुरक्षिततेबद्दलचे अज्ञान त्यातील सर्वात जास्त महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अन्नाचे सेवन करणा-यांना मोठा धोका उद््भवू शकतो. यामध्ये पोटदुखी, अतिसार, ताप, कावीळ, मूत्रपिंड मेंदूचे आजार अशा विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात अतिसार आल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्याचप्रमाणे गरोदर माता, वृद्ध यांच्यात अशा आजारांचे परिणाम घातक ठरू शकतात,असे डॉ. साठे म्हणाल्या.

अन्नसाखळीतील दूषितपणा थांबवा अन्नसाखळीतएखादा घटक दूषित असला तर ते अन्न सेवन करणा-या जनतेला त्यापासून धोका असतो. अशा प्रकारच्या घातक आजारामुळे महाग चाचण्या, उपचार याचा खर्च वाढतो. गरिबी वाढते त्यामुळे रुग्णाला त्यांच्या कुटुंबाला परवडणा-या अन्नाच्या गुणवत्तेत आणखीन घट होते. त्यापासून होणा-या आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे अन्न सुरक्षेतील दूषितपणा टाळण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज आहे.
लेखिका या सिव्हीलमधील निवासी डाॅक्टर आहेत.

अशी घ्या काळजी
>बाहेरीलअन्नपदार्थ खाणे टाळावे
>जागा स्वच्छ आहे का याची खात्री करून हात साबणाने स्वच्छ धुवावेत
>कच्चे शिजवलेले अन्न वेगवेगळे साठवावे
>अन्न चांगल्या प्रकारे शिजवावे
>अन्न बनवल्यानंतर लगेच खावे
>कच्चे पदार्थ पाणी स्वच्छ निर्जंतुक करून खावे