आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहारातील नियमांचे कुपोषण, जिवाशी होतोय खेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शालेय पोषण आहारातील गडबडींमुळे करमाळ्यातील कोर्टी गावातल्या १७५ विद्यार्थ्यांना विषबाधेचा सामना करावा लागला. त्यातील कारणे शोधली असता, विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे प्रकार दिसून येतील. हा प्रकार केवळ कोर्टी गावापुरता मर्यादित नाही.
शहर आणि जिल्ह्यातील सुमारे हजार शाळांमध्ये अशीच अव्यवस्था आहे. आहाराचा दर्जा, त्यासाठी लागणारे परवाने, त्याचे नियम आदी धाब्यावर बसवण्यात आले. त्यामुळे कोर्टीसारखी घटना पुन्हा कुठे घडली तर नवल वाटू नये, अशीच स्थिती दिसते. विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार शिजवून शाळेत आणल्यानंतर त्याची मुख्याध्यापक शिक्षकांनी चव घेऊन ते तपासणी करायची असते. अर्ध्या तासानंतर विद्यार्थ्यांना खाण्यास द्यायचे असते, या नियमांचे पालनच होत नाही. कोण शिजवतो, कशा पद्धतीने शिजवतो, त्यात काय काय घालतो, या बाबी तपासणी यंत्रणाच नाही.

निमयपाळणे आवश्यक : परवानाघेणाऱ्या घटकांनी कायद्यानुसार २१ नियम पाळणे गरजेचे आहे.
३० शहर
११० िजल्हा
एकूण प्रति विद्यार्थ्यासाठी असे मिळते अनुदान
लाभार्थीगट आहाराचे प्रमाण प्रतिदिन इंधन भाजीपाला
प्राथमिक१०० ग्रॅम तांदूळ २.८० पैसे रुपये
माध्यमिक १५० ग्रॅमतांदूळ ४.३३ पैसे १.३० रुपये