आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी संमेलनाध्यक्षपदी राजेंद्र कुंभार यांची निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सत्यशोधक ओबीसी साहित्य परिषदेच्या वतीने 9 व 10 फेब्रुवारीला सोलापुरात दुसरे ओबीसी साहित्य संमेलन होणार आहे. छत्रपती शिवाजी रंगभवन येथे हे संमेलन होणार असून, अध्यक्षपदी लेखक डॉ. राजेंद्र कुंभार (कोल्हापूर) यांची निवड झाली आहे. परिषदेचे राज्य अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी ही माहिती बुधवारी पत्रकारांना दिली.

संमेलन भरवण्याची भूमिका र्शी. उपरे यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, देशातील आजही ओबीसी वर्ग अनेक घटकांपासून वंचित आहे. तो विखुरलेला आहे. त्यांचे संघटिकरण व्हावे या हेतूने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. 9 फेब्रुवारीला तीन सत्रांत वेगवेगळे मान्यवर विचार मांडणार आहेत. संध्याकाळी काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी 3 विभागात चर्चासत्रे होतील. हे खुले स्वरूपाचे असेल. साहित्य संमेलनाचे कार्यालय भागवत चित्रपटगृह संकुलासमोरील वैष्णवी हॉटेल येथे असणार आहे. अनेक विचारवंत, कवी, आपले विचार मांडणार आहेत. या संमेलनात ओबीसींच्या हितासाठी काम करणार्‍यांचा गौरव ओबीसी मित्र पुरस्काराने करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषेदेसाठी प्रा. राजन दीक्षित, पी.आर. बनसोडे, युवराज चुंबळकर, नितीन जाधव, विशाखा जाधव आदी उपस्थित होते.