आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Officers Aware They Are Servants Of Citizens Umesh Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनतेचे नोकर असल्याची जाणीव ठेवावी- उमेश पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - शासकीयअधिका-यांनी आपण जनतेचे नोकर असल्याची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्या आक्रमकतेचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत असलेल्या अक्कलकोट, मंगळवेढा आदी तालुक्यात पक्षवाढीसाठी पुढाकार घेतल्यास पक्ष त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. रविवारी मार्डी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, कोणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात अपशब्द वापरत आहे. कार्यकर्त्यांनी अशांना चोख उत्तर द्यावे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे म्हणाले, आजवर उत्तर सोलापूरचा विकास झाला नाही. आता रमेश कदम यांच्यामुळे सक्षम आमदार मिळाला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून विकासाचे प्रश्न मार्गी लावून घ्यावेत.
विधानसभेत निवडून आल्यानंतर १०० दिवसांत मतदारसंघातील प्रश्नांचा अभ्यास करून सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून आमदार कदम म्हणाले, उत्तर सोलापुरातील ८० टक्के गावे पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना मोफत बोअर देऊन पाणी उपलब्ध करून दिले. तसेच शिरापूर योजनेचे पाणी महिनाभरात तालुक्याला मिळणार आहे. पंढरपूरमधील १७ गावांच्या रस्त्यांचा प्रश्न आतापर्यंत सुटला नव्हता. मात्र, आता लवकरच मार्गी लागणार आहे.
या वेळी बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, धर्मराज पवार, प्रल्हाद काशीद, संतोष जाधव, संतोष भेगडे, नागेश अक्कलकोटे, दयानंद शिंदे, मनोज साठे, हरिदास घाडगे, श्रीकांत मार्तंडे यांची प्रमुख उपस्थती होती.

आमदार कदम माध्यमांवरही घसरले
टंचाईग्रस्तगावांना मोफत बोअर मारून पाणी उपलब्ध करून देणे गुन्हा आहे काय, असा सवाल करत मोहोळचे आमदार रमेश कदम यांनी याची कोण चौकशी करतो पाहू, अशी भाषा वापरली. तसेच शिवराळ भाषा वापरली. तसेच माध्यमातून माझ्याविरोधात टीका होत असली तरी मी त्याला भीक घालत नसल्याची दर्पोक्तीही त्यांनी केली. कितीही गुन्हे दाखल करा, आमदारकीपासून मला कोणी रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले.