सोलापूर - शनिवारीसकाळी नऊपासूनच जिल्हा न्यायालयात नागरिक, पक्षकार, वकिलांची गर्दी होती. अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी दोन्ही पार्टीकडून चर्चा वकिलांचा सल्ला घेणे सुरू होते. महिला, लहान मुले, तरुण, नागरिक, बँक अधिकारी, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अनेक प्रकारचे लोक उपस्थित होते. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर शहर यासह संपूर्ण जिल्ह्यात २६ हजार ९३६ खटले यात ठेवले होते. त्यापैकी ३७८९ खटले निकाली लागले. १६ कोटी २९ लाख ७७ हजार ५०० रुपये तडजोडीने वसूल करण्यात आले. एकूण बत्तीस पॅनेल तयार केले होते.
सुरुवातीला मुख्य जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचवि न्यायाधिश त्रिपाठी यांच्यासह सर्व न्यायाधीश, वकील, बारचे अध्यक्ष अप्पा शिंदे, सचवि भीमाशंकर कत्ते उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्यभर लोकअदालतीचे आयोजन केले होते.
-अनेक दविस खटला प्रलंबित असला की पैसा, वेळ, श्रम वाया जातो. समोपचाराने जर खटले मटित असतील तर चांगली गोष्ट आहे. विधी सेवा प्राधिकरण विभागाने ही संधी उपल्बध करून दिली आहे. सामोपचाराने खटले मटिावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. यामुळे एकोपा, शांतता नांदते. लवकर न्याय मिळण्यास मदत होईल. अश्विनीकुमारदेवरे, मुख्यजिल्हा न्यायाधीश